Postprandial Sleepiness: जेवल्यानंतर आळस किंवा झोप का येते; काय आहे याचं शास्त्रीय कारण?

Anirudha Sankpal

आपल्याला दुपारच्या जेवल्यानंतर आळस किंवा झोप येते. ऑफिसमध्ये असाल तर काम मंदावतं.

आपण लगेच ही झोप घालवण्यासाठी ना ना प्रकारचे उपाय करतो. मात्र ही झोप नेमकी कशामुळं येते? जाणून घेऊयात त्याची शास्त्रीय कारणं

खूप किंवा जड जेवण केल्यावर अन्न पचनासाठी शरीरातील अधिक रक्त पचनसंस्थेकडे (पोट, आतडे) प्रवाहित होते.

पचनसंस्थेकडे रक्त वळल्यामुळे, तात्पुरत्या स्वरूपात मेंदू आणि शरीराच्या इतर भागाकडे होणारा रक्ताचा प्रवाह कमी होतो, ज्यामुळे सुस्तपणा येतो.

कार्बोहायड्रेट्सयुक्त (उदा. भात, ब्रेड) जेवणानंतर सेरोटोनिन (शांतता देणारे रसायन) या संप्रेरकाची पातळी वाढू शकते, ज्यामुळे आराम मिळतो.

मांस, अंडी, दुग्धजन्य पदार्थांमधील 'ट्रिप्टोफॅन' अमिनो ॲसिडमुळे झोपेसाठी आवश्यक असलेले मेलाटोनिन हार्मोन तयार होण्यास मदत होते.

जास्त कार्बोहायड्रेट्स किंवा साखरेचे पदार्थ खाल्ल्यास रक्तातील साखरेच्या पातळीत झपाट्यानं चढ उतार होतो. या शुगर क्रॅशमळं थकवा, अशक्तपणा आणि झोप येते.

जड, तेलकट, तळलेले किंवा जास्त कार्बोहायड्रेट्स असलेले जेवण पचायला जास्त वेळ घेते, ज्यामुळे जास्त सुस्ती येते.

जेवणानंतरची सुस्ती कमी करण्यासाठी जेवणानंतर १०-१५ मिनिटे चालणे, भरपूर पाणी पिणे आणि जास्त गोड व तळलेले पदार्थ टाळणे आवश्यक आहे.

येथे क्लिक करा