Sanjay Raut On Raj-Uddhav Thackeray Alliance : महानगरपालका निवडणुकीसाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये बैठका सुरु आहेत. माध्यमांनी त्याची माहिती घ्यावी. ९० दिवस निवडणुकीला राहिलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत चर्चा सुरु आहे. माध्यमांना वाटतं की तत्काळ युती जाहीर कराव; पण युती केव्हा जाहीर करायची ही उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोन नेते ठरवतील. कुठलेही संभ्रम नाही सगळं उद्धव ठाकरे बोलतील, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. २) दिली.शिवसेना ठाकरे गटाच्या दसर्या मेळाव्यापूर्वी ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, "शिवसेना परंपरानुसार शिवतीर्थवर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ही बाळासाहेब ठाकरे यांनी आखून दिलेली परंपरा आहे. यामध्ये खंड पडून ये, प्रत्यक्ष मैदानावर सभा व्हावी यासाठी शिवसैनिक झटत होते. विचारांचा आदान प्रदान व्हायला हवं. जनतेला शिवसेनेचा विचार मिळायला हवा यासाठी कार्यकर्ते निघाले आहेत. आम्ही चिखल फेकू, चिखल फेकला पाहिजे. काही सण आहेत त्यात चिखल फेकतात. त्यांना या बद्दल माहिती नाही. गद्दारचे मेळावे होत आहेत त्यावर चिखल फेकायचा नाही तर मग काय प्राजक्ताचे फुल फेकायचे. पाकिस्तान सोबत खेळणाऱ्यावर चिखल फेकला पाहिजे. ज्याला जी भाषा समजते त्या भाषेत उत्तर द्यायला पाहिजे."
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मोळा नागपुरात होत आहे. त्यांचे संचलन करतात काठ्या हातात असतात. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की, काठ्यांनी राष्ट्राचे संरक्षण होणार नाही शिवसैनिकांना एके-47 द्या. आज सत्तेचा तेज त्यांच्याकडे आहे. संघाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांनी महान राष्ट्र कार्य केले आहे. हिंदू साठी महान कार्य त्यांनी केलं आहे;पण राष्ट्रासाठी कठोर भूमिका घ्यायच्या असतात त्या भूमिका त्यांनी घेतल्या नाहीत. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही संघाचा समर्थन केलं नाही. संघ हा विष आहे असा आंबेडकर म्हणाले होते, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.