मुंबई

पंतप्रधान मोदींमुळेच राम मंदिर उभे राहिले : राज ठाकरे

दिनेश चोरगे

ऑनलाईन पुढारी डेस्क : पंतप्रधान मोदी यांच्यामुळे अयोध्यातील राम मंदिर उभे राहिले, अन्यथा ते उभे राहिले नसते. अनेक वर्षापासून ३७० कलम रद्द होऊ शकलं नाही, ते पंतप्रधान मोदींमुळे झालं, असे प्रतिपादन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे केले. देशात सात टप्यात निवडणुका होत असून निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या निमित्त आज महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात होते. यानिमित्त आज (दि.१७) दादरच्या शिवाजी पार्कमध्ये महायुतींची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

नव्वदच्या दशकात बाबरी मशिदीचं प्रकरण घडलं. हजारो कारसेवक उत्तर प्रदेशमध्ये गेल्यानंतर मुलायम सिंह यादव यांच्या लोकांनी , पोलिसांनी कारसेवकांना ठार मारले. नदीमध्ये प्रेत फेकून दिली. ते चित्र काही माझ्या डोळ्यासमोरून गेले नाही. त्यानंतर काही कारसेवकांनी बाबरीचा डाच्चा पडला. यानंतर राम मंदिर होईल की नाही, असं वाटतं होतं. पण पंतप्रधान मोदी यांच्यामुळे ते राम मंदिर बनलं, असेही उपमुख्यमंत्री  फडणवीस यावेळी म्हणाले.

अनेक वर्षापासून एक गोष्ट माझ्या कानावर सतत पडत होती. ३७० कलम रद्द झालं पाहिजे, इतक्या वर्षात जी गोष्ट होऊ शकली नाही ती नरेंद मोदी यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत करून दाखवली. आज काश्मीरमध्ये जाऊन आपण जमीन घेऊ शकतो, तो एक भारताचाच भाग आहे हे आता सिध्द झालं. असेही ते म्हणाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पियुश गोयल, नारायण राणे रामदास आठवले,जोगेंद्र कवाळे, अशिष शेलार सुनिल तटकरे हे मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT