राज ठाकरेंनी 'वन नेशन,वन इलेक्शन'ची उडवली खिल्ली Pudhari online
मुंबई

One Nation One Election : राज ठाकरेंनी 'वन नेशन, वन इलेक्शन'ची उडवली खिल्ली; म्हणाले...

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'एक देश, एक निवडणूक' संकल्पनेला बुधवारी (दि.18) केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. देशभरातून या संकल्पनेला कडाडून विरोध होत आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लटफॉर्म 'एक्स'वर निवडणूका संदर्भात पोस्ट करत या संकल्पनेची खिल्ली उडवली आहे. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना आधी महापालिका, नगरपालिका, स्थानिक संस्थाच्या निवडणूका घ्या अशी मागणी केली आहे.

याबरोबरच या संकल्पनेबाबत स्पष्ट प्रश्न विचारले आहेत. यामध्ये देशातील प्रत्येक राज्याचे मत घ्यायला हवे, राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा सुद्धा कायदा पारित करताना व्हायला हवी, अशी मागणी केली आहे. तसेच 'वन नेशन, वन इलेक्शन'वर महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच या कायद्याबद्दल अधिक खुलासा शासनाने करावा, अशी इच्छा वर्तवली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT