Raj Thackeray राष्ट्रवादीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुखद निधन झाले. 28 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर चौथ्याच दिवशी राज्याच्या राजकारणात प्रंचड घडमोडी घडल्या व अजित पवार यांच्यास पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या घटनांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कठोर भाषेत टिका केली आहे.
गेले दोन दिवस राष्ट्रवादीचे नेते प्रफूल्ल पटेल व सुनिल तटकरे हे बैठकांवर बैठका घेत आहेत. याचा संदर्भ घेत त्यांनी थेट पटेल यांना लक्ष्य केले आहे. मराठा समाजाचा मराठमोळा असलेल्या राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष हा ‘पाटील’ असावा ‘पटेल’ नको अशी उपहासात्मक टीका केली आहे. गेल्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे असे ही ते म्हटले आहेत
पुढे ते म्हणाले की आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही ! अशी थेट टीका केली आहे.