मुंबई: रायगड जिल्हा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष पंकज तांबे यांच्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक माजी सरपंचांनी व कार्यकर्त्यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले.
भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, भाजपचे विधान परिषद गटनेते आ. प्रवीण दरेकर, निजामपूर मंडल अध्यक्ष युवराज मुंढे, सरचिटणीस निलेश राशीनकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मंदार महामुनकर, बापूसाहेब सोनगिरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या सर्व कार्यकर्त्यांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाला साथ देण्यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या सर्वांचा उचित सन्मान राखला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये निजामपूरचे स्वप्नील शिर्के, वावे दिवालीचे माजी सरपंच शरद कदम, निलजचे माजी सरपंच प्रमोद जाधव, शिखलीचे माजी सरपंच विजय नलावडे, सयाजी नलावडे, ॲड. रुपेश वाढवळ, अनंत मोरे, गजानन चव्हाण, प्रकाश शिंदे, प्रताप कडू, समीर म्हसकर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.