Protests against the government by the Maha Vikas Aghadi on the steps of the Legislature
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची निदर्शने  Pudhari Photo
मुंबई

'सामान्य माणूस कमवतो पाई पाई, त्याला लुटून खाते महायुतीच्या काळातील महागाई'

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्‍तसेवा

राज्यात वाढलेल्या महागाईच्या विरोधात पावसाळीअधिवेशनाच्या आज (शुक्रवार) आठव्या दिवशी विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडी आक्रमक झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी 'सामान्य माणूस कमवतो पाई-पाई, त्याला लुटून खाते महायुतीच्या काळातील महागाई', 'सरकारने लुटली सरकारी तिजोरी जनतेच्या हाती दिली महागाईची शिदोरी' अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

महागाई विरोधात महाविकास आघाडीच्या घोषणा

भाजी महागली, कडधान्य महागले, खत बियाणे महागले, महागाईने मध्यमवर्गीय कोलमडले, सरकारने लुटली सरकारी तिजोरी जनतेच्या हाती दिली महागाईची शिदोरी, सामान्य माणूस कमवतो पाई पाई, त्याला लुटून खाते महायुतीच्या काळातील महागाई, महागाईने जनता त्रस्त महायुती सरकार वसुलीत व्यस्त अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत वाढत्या महागाई विरोधात महाविकास आघाडीने घोषणा देत महायुती सरकारला घेरले.

सरकार आहे वसुलीत मस्त महागाईने जनता त्रस्त, खोके सरकार हाय हाय, महागाईवर नियंत्रण न ठेवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, बियाणांचा दर वाढवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, महागाई हाय हाय, केंद्रसरकार हाय हाय अशी जोरदार घोषणाबाजी केली.

SCROLL FOR NEXT