खासदार प्रियांका चतुर्वेदी Pudhari Photo
मुंबई

Priyanka Chaturvedi | मराठी येतं की नाही? ट्रोल करणाऱ्या शिंदे सेनेला प्रियांका चतुर्वेदींनी सुनावलं

माझ्या कुटुंबाला काही त्रास झाला तर शिंदे सेनेच्या महिला प्रवक्‍त्‍या जबाबदार राहतील

Namdev Gharal

मुंबईः दोन दिवसांपूर्वी एका इंग्रजी टिव्ही चॅनलमध्ये डिबेटमध्ये गेले होते. याचा विषय मराठी विरुद्ध हिंदी असा होता. यामध्ये अँकरने विचारले होते की तुम्‍हाला मराठी येते का? यावेळी मी म्‍हटले होते की मला मराठी येते पण ते कमजोर आहे फराट्टेदार नाही. यावर माझे ट्रोलिंग झाले पण त्‍या महिला पदाधिकार्‍याने माझा पत्ता सोशल मिडीयावर टाकला आहे.

आता माझ्या कुंटुबाला असुरक्षित वातावरणात राहावे लागत आहे. आणि तिथे काही झाले तर ती जबाबदारी शिंदे यांच्या पक्षाच्या प्रवक्‍त्‍याची राहील अशा शब्‍दात शिवसेना (उबाठा) गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदींनी ट्रोलर्सना उत्तर दिले आहे. सोशल मिडीयावर व्हिडीओ टाकत त्‍यांनी आपल्‍या भावना मराठीमध्ये मांडल्‍या आहेत.

याबाबत पुढे त्‍या म्‍हणाल्‍या की या डिबेटमध्ये उबाठा गटाचे विचार मी मांडत होते. त्‍याच्या प्रश्नाला मी उत्तर दिले, माझे म्‍हणने मी अँकरला सांगितले. ते त्‍या अँकरला काय समजले ते माहित नाही पण एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या महिला प्रवक्‍त्यांनी माझे ट्रोलिंग सुरु केले. मी सहसा ट्रोलिंग उतर देत नाही पण त्‍या महिला पदाधिकार्‍याने माझा पत्ता सोशल मिडीयावर टाकला आहे. ही त्‍यांनी आता हद्दच पार केली आहे. माझ्या कुटुंबाचे काही झाले तर ती जबाबदारी शिंदे पक्षाच्या प्रवक्‍त्‍याची राहील असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

माझे मराठी कमजोर असेल पण मी गद्दार नाही

प्रियांका चतुर्वेदी यांनी पुढे म्‍हटले आहे की माझी मराठी कमजोर असेल पण मी कधीही गद्दार नाही. मी मराठी बोलू शकते पण शिंदेच्या शिवसेनेला वाटते मला अजिबात मराठी येत नाही. यातून त्‍यांनी माझे ट्रोलिंग सुरु केले. २ टक्‍केच्या प्रसिद्धीसाठी व फेमसाठी त्‍यांनी माझी ट्रोलिंग केली आहे. पण त्‍यांना सांगते की माझी इमान कमजोर नाही मी गद्दार नाही एवढेच मी सांगते. याचा विचार शिंदे यांच्या पक्षाच्या तुम्‍ही महिला प्रवक्‍त्या आणि सर्व महिला गँगने करावा असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT