

Uddhav Thackeray slams BJP no one left to defend party
मुंबईः शिवसेना आणि भाजप युती होती त्यावेळचा भाजप हा खरा पक्ष होता. आता मात्र आता भाजपने बाहेरच्या पक्षातील भरती करुन मूळ पक्षच मारुन टाकला आहे. आता त्यांच्या पक्षामध्ये ऊर बडवायला देखील माणसे नाहीत, अशी घणाघाती टीका उबाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली. ते आज ठाकरे गटाच्या आमदांबरोर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही; पण ती भाषा आमच्यावर लादली गेली नसली पाहीजे. ठाकरेच्या विजयी मेळाव्यामुळे भाजपाला मिरच्या झोंबल्या आहेत. मात्र मराठी माणसांसाठी हा विजयी मेळावा प्रेरणा देणारा ठरला आहे. भाजपा हा पक्ष मराठी माणसांचा मारेकरी आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
पुढे त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारला सवाल केला की पहलगामध्ये ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला ते दहशतवादी कसे सापडत नाहीत. ते दशतवादी गेले कुठे असे विचारत ठाकरे यांनी टीका केली. मराठी भाषकांवर अन्याय कमरणाऱ्यांना अभय देण्याचे काम भाजपा करत आहे. त्यांचा मूळ पक्ष संपला असून त्यांनी आमच्या पक्षातील, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षातील ऊरबडवे आपल्या पक्षात घेतले आहेत. याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
पुढे ते म्हणाली भाजपाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यांच्या बुडाला आग लागली आहे पण ती सर्वांसमोर दाखवताही येत नाही तसेच ती लपवताही येत नाही असा ठाकरी शैलीत समाचार घेतला. सध्या भाजमामध्ये अंत्यंत हीनकस व विकृत माणसे आहेत. ही लोक म्हणजे ‘लकडबग्गा’सारखी अंत्यत धोकादायक आहेत अशी उपमाही त्यांनी भाजपा दिली.