Namo Sahakari Taxi Pudhari
मुंबई

Pravin Darekar: सीजेपीने आंबेडकरी जनतेची आणि महाराष्ट्राची माफी मागावी; प्रवीण दरेकर यांची मागणी

शिवाजी पार्कवरील आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत चुकीची माहिती दिल्याचा दरेकरांचा आरोप; पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि फडणवीसांवरील वक्तव्यांवरही टीका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: शुक्रवारी शिवाजी पार्कवर झालेल्‍या सीजेपीच्या आंदोलनात चुकीची माहिती देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अपमान करण्याचा प्रकार घडल्याने आंबेडकरी आणि राज्यातील जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

त्यामुळे सीजेपीने आंबेडकरी जनतेची आणि महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी भाजप गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी शनिवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहमाध्यम प्रमुख ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.

सीजेपीचे आंदोलन पूर्ण अयशस्वी ठरलेे. या विद्रोही आंदोलनाला कोणताही प्रतिसाद न दिल्याबद्दल दरेकर यांनी मुंबईकरांना मनापासून धन्यवाद दिले. हे आंदोलन योग्यप्रकारे हाताळल्याबद्दल मुंबई पोलिसांचेही त्यांनी अभिनंदन केले.

या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी करण्यात आलेल्या वक्तव्यांवरही दरेकर यांनी जोरदार टीका केली.

शाहू, फुले, डॉ. आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील सहिष्णू जनतेला ही निवडणूक आयोगावर विश्वास नसेल तर सर्वप्रथम आदित्य ठाकरे आणि महेश सावंत यांनी आधी आमदारकीचे राजीनामे द्यावेत आणि मगच आंदोलनात सहभागी व्हावे. कारण तेही याच निवडणुकीच्या प्रक्रियेतून निवडून आले आहेत, असे आव्‍हानही प्रवीण दरेकर यांनी दिले.

एसआयआरच्‍या कायदेशीर प्रक्रियेबद्दल न बोलता केवळ ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. केवळ गोंधळ निर्माण करणे आणि असंतोष वाढवून अराजकतेची परिस्थिती निर्माण करण्याचा हा प्रयत्न योग्य नसल्याचे दरेेकर म्हणाले.

सीजेपी काँग्रेसची ‘बी टीम’

आंदोलन काँग्रेसच्या स्क्रिप्टवर झाले. दीपके हे काँग्रेसचा चेहरा आहे आणि हे आंदोलन काँग्रेस प्रायोजित आंदोलन होते, असा आरोप करून प्रवीण दरेकर म्‍हणाले, सीजेपी ही काँग्रेसची ‘बी टीम’ म्हणून काम करत आहे. मोर्चामध्ये डाव्या विचारसरणीतून आलेले लोक पाहायला मिळाले. आंदोलनाला प्रतिसाद न मिळाल्याने नैराश्य आलेले आणि भांबावलेले दीपके पाहायला मिळाले. भाजपाचा द्वेष आणि काँग्रेसचे मोठेपण सांगण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT