Ramdas Athawale: ‘भाजपकडून काहीही मिळाले नाही’; रामदास आठवलेंची महायुतीवर नाराजी, राष्ट्रवादीचे केले कौतुक

रामदास आठवले यांनी महायुतीवर रिपब्लिकन पक्षाची हेळसांड केल्याचा आरोप केला; काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सात आमदारकी मिळाल्याचा दावा.
Ramdas Athawale
Ramdas Athawalepudhari photo
Published on: 
Updated on: 

नवी मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीमध्ये चौदा वर्षे सत्तेत असलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे गोडवे गायले आणि महायुतीने हेळसांड केल्‍याचा आरोप केला.

भाजपाकडून रिपब्लिकन पक्षाला काहीही मिळाले नाही. उलट काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत असताना आम्हाला सात आमदारक्‍या मिळाल्या होत्या, असे ते म्‍हणाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Ramdas Athawale
Maharashtra Monsoon Exit: दुष्काळ मागे ठेवून मान्‍सून परत निघाला! आला उशिरा, निघाला मात्र लवकरच

राज्यात एखादा मंत्री, एखादा आमदार आमचा असायला हवा होता. विधानसभेला आम्हाला चार -पाच जागा दिल्या असत्या तर एक दोन जागा निवडून आल्या असत्या, अशी खंत आठवले यांनी व्‍यक्‍त केली. ते म्‍हणाले, मुंबई महानगरपालिकेत रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे. पण आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात जागा दिल्या जात नाहीत.

अर्थात रिपब्लिकन पक्षाला सत्तेत स्थान देणे ही केवळ भाजपाची जबाबदारी नाही. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही रिपब्लिकन पक्षाला महत्त्व दिले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी याबाबत मी बोललो आहे.

मला मंत्रिपद मिळाले असले तरी आमच्या कार्यकर्त्यांनादेखील न्याय मिळाला पाहिजे, असे आठवले म्‍हणाले. मलादेखील पक्ष चालवायचा आहे. आमच्या कार्यकर्त्यांना सत्तेत स्थान मिळाले पाहिजे. नागालँड, मणिपूरमध्ये आमची ताकद आहे. तिथे ६० पैकी ५० जागा लढण्याची आमची तयारी आहे. मणिपूरमध्ये आमचा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीदेखील होऊ शकतो, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

Ramdas Athawale
Virat Garjana Morcha: ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज ठाकरे बंधूंचा मोर्चा; काँग्रेस आणि शरद पवार गटाचाही पाठिंबा

कॉक्रोच जनता पार्टी ही पार्टी अमेरिकेत स्थापन झाली आहे. त्यांनी तिकडे आंदोलन केले पाहिजे. राजीनामा मागण्यासाठीच पार्टी स्थापन केली असेल तर राजीनामा जनता पार्टी असे नाव ठेवले पाहिजे. ठाकरे बंधूंना आता मोर्चे काढणे गरजेचे आहे. कारण त्यांना सत्ता मिळवायची आहे; पण आता त्यांना लवकर सत्ता मिळण्याची शक्यता नाही, असे टोले आठवले यांनी लगावले.

logo
Pudhari News
pudhari.news