नायर‌’च्या वसतिगृहात एका खोलीत राहतात 11 विद्यार्थी file photo
मुंबई

Nair Dental College hostel issue‌ : ‘नायर‌’च्या वसतिगृहात एका खोलीत राहतात 11 विद्यार्थी

अस्वच्छता, दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नायर दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहात दंतवैद्यकीय विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याची बाब समोर आली आहे. एकीकडे अस्वच्छता आणि सुरक्षेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असताना दुसरीकडे एका-एका खोलीत तब्बल 10 ते 11 विद्यार्थीराहत असल्याचे अत्यंत विदारक वास्तव समोर आले आहे.

नियमानुसार मर्यादित संख्येत निवास व्यवस्था अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र गर्दीमुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच अनेक विद्यार्थ्यांना बेड देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र दीड वर्ष उलटूनही काही विद्यार्थ्यांना बेड मिळालेले नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपावे लागत आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे.

सर्वांत गंभीर बाब म्हणजे वसतिगृहात अग्निसुरक्षा व्यवस्थेचा अभाव आहे. आग लागल्यास आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळा असणे आवश्यक असताना काही ठिकाणी तो बंद ठेवण्यात आला आहे. ही बाब विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करण्यासारखी असल्याची संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

तातडीने उपाययोजनांची मागणी

विद्यार्थ्यांनी पालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन स्वतंत्र वसतिगृह व्यवस्था, पुरेसे बेड, लॉकर सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षा उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.

  • ‌‘नायर दंत रुग्णालयाच्या वसतिगृहात अस्वच्छतेचे साम्राज्य‌’ या मथळ्याखाली दैनिक पुढारीमध्ये शुक्रवार, दि. 6 फेब्रुवारीच्या अंकात बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही रुग्णालय प्रशासनाने या प्रकाराची कुठलीही दखल घेतली नसल्याचे विद्यार्थ्यानी सांगितले. वसतिगृहात स्वच्छता करण्यात आलेली नसल्यामुळे कचऱ्याचे ढीग साचले असून संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT