नवी मुंबई ः मार्गशीर्ष महिना सुरू असल्याने मासळीला मागणी कमी झाली असून दरात 20 टक्क्यांनी कमी झाले आहेत. सुरमई, पापलेट शंभर रूपयांनी स्वस्त झाले आहे. हलवा, कोळंबीचे दर मात्र स्थीर आहेत.
महिलांचे उपवास असल्याने मासाळीला नेहमीप्रमाणे उठाव नाही. मासळी जास्त दिवस टिकत नसल्याने मिळेल त्या दराने विक्री करावी लागत आहे. दोन आठवडयांनी मार्गशीष महिना संपल्यानंतर मासळीच्या दरात वाढ होईल असे विक्रेते गोरख खारटमोल यांनी सांगितले.
सुरमई 800 रुपयांना होती, तिचे दर आता 700 रुपयांवर आले आहेत. तर पापलेट एक हजारवरुन 900 रुपये झाले आहेत. त्याचप्रमाणे मांदली 100 रुपयांवरुन 80 रुपयांवर, बांगडा 150 रुपयांवरुन 120 रुपयांवर दर आला आहे.