Mumbai Crime News : मुंबई विमानतळावर २३ कोटींचे अमलीपदार्थ पोलिसांनी केले जप्त File Photo
मुंबई

Mumbai Drugs seized : मुंबई विमानतळावर २३ कोटींचे अमलीपदार्थ पोलिसांनी केले जप्त

हायड्रोपोनिक गांजा; कोकेनच्या कॅप्सुल ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Police seize drugs worth Rs 23 crore at Mumbai airport

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमाशुल्क विभाग व महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी दोन मोठ्या कारवाया करून २३ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. त्यातील पहिल्या कारवाईत थायलंडहून तस्करी करून आणलेला सुमारे १२ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला.

या गांजाची बेकायदेशीर बाजारातील किंमत सुमारे १२ कोटी रुपये असून या प्रकरणी दोन भारतीय प्रवाशांना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. याशिवाय डीआरआयने केलेल्या कारवाईत अंमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या परदेशी नागरिकाच्या पोटातून कोकेन भरलेल्या ६७ कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या आहेत.

त्यांची किंमत ११ कोटी ३९ लाख रुपये आहे. आणखी एका कारवाईत सव्वा चार कोटी रुपयांच्या सोन्यासह दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पहिल्या कारवाईत, बँकॉकहून काही संशयीत व्यक्ती मोठ्याप्रमाणात गांजा घेऊन येत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती.

त्यानुसार सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या दोन भारतीय प्रवाशांना अडवले. त्यांच्या तपासणीदरम्यान त्यांच्याकडे असलेल्या बॅगेत व्हॅक्यूम सील पद्धतीने काही संशयीस्पद पदार्थ लपवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. हिरव्या रंगाच्या या पदार्थांची तपासणी केली असता ते हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी प्रवाशांकडून ११ किलो ८८१ ग्रॅम वजनाचा हाड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ११ कोटी ८८ लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोटातून कोकेनच्या कॅप्सुल

देशात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आयव्हरी कोस्ट देशाच्या नागरिकाबाबत गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयने १९ जूनला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले होते. तो सिएरा लिओनहून मुंबई विमानतळावर आला होता.

प्राथमिक चौकशीत संबंधित प्रवाशाने भारतात अंमली पदार्थांची तस्करी करण्याच्या उद्देशाने काही कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांत त्याने एकूण ६७ कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या आहेत. त्यात ११३० ग्रॅम कोकेन सापडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT