MPSC : परीक्षार्थीना 'केवायसी' पूर्ण करणे बंधनकारक, एमपीएससीचे निर्देश

आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी 'केवायसी' प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
MPSC News
MPSC : परीक्षार्थीना 'केवायसी' पूर्ण करणे बंधनकारक, एमपीएससीचे निर्देशPudhari Photo
Published on
Updated on

It is mandatory for candidates to complete 'KYC', MPSC instructions

मुंबईः पुढारी वृत्तसेवा

राज्यातील विविध परीक्षांमध्ये व भरतीप्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आता एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी 'केवायसी' प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

MPSC News
Mumbai Political News : चांदिवली मतदारसंघात उबाठाला धक्‍का

एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना खालील चारपैकी कोणत्याही एका पद्धतीने ओळख पडताळणी करावी लागणार आहे, आधार ऑनलाइन ई-केवायसी, आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी, आधार ऑफलाईन पेपर आधारित केवायसी किंवा नॉन-आधार ऑफलाईन केवायसी.

ही प्रक्रिया उमेदवाराने अजी करण्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. एकदाच नोंदणी करताना उमेदवाराने आपला मोबाईल नंबर आणि ई-मेला आयडी प्रणालीत नोंदवणे बंधनकारक असून, आधार आधारित ओळख पडताळणीसाठी आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल क्रमांकदेखील द्यावा लागणार आहे.एमपीएससीच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवाराच्या खात्यात आधार क्रमांक नोंदविण्याची सुविधा मार्च २०१७ पासूनच उपलब्ध आहे. मात्र आता ती प्रक्रिया सक्तीची करण्यात आली आहे. या व्यवस्थेमुळे उमेदवाराची ओळख अचूकरीत्या अधिप्रमाणित करता येणार आहे.

MPSC News
Military schools' policy : सैनिक घडवण्यासाठी सैनिकी शाळांचे धोरण बदलणार

त्यामुळे चुकीच्या माहितीला आळा बसेल. विशेष म्हणजे, विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि राज्य शासनाने स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर उमेदवारांचे प्रमाणीकरण करण्यासाठी स्वेच्छेने आधार प्रमाणीकरणास एमपीएससीला अधिकृत मान्यता दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news