लोकलच्या महिला डब्यात आता सकाळी ८ पर्यंत पोलीस pudhari photo
मुंबई

Railway Security : लोकलच्या महिला डब्यात आता सकाळी ८ पर्यंत पोलीस

गर्दुल्ले उपद्रव, ड्रग्जबाबत पंचवीस दिवसांत निर्णय

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी यापुढे लोकलच्या महिला डब्यात आता रात्री ९ ते सकाळी ८ पर्यंत पोलीस-गार्ड तैनात ठेवण्यात येणार आहे. याआधी सकाळी ६ वाजेपर्यंतच ही सुरक्षा होती. शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य रवींद्र फाटक यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन स्टेशन परिसरातील सीसीटीव्हींच्या संख्येत वाढ केली जाईल. तसेच रेल्वे परिसरातील गर्दुल्ल्यांचा उपद्रव बंद करण्याबाबत येत्या १५ दिवसांत रेल्वे पोलीस आयुक्तांशी बैठक घेण्यात येईल. गर्दुल्ल्यांचा रेकॉर्ड तपासून २५ दिवसांत कारवाई केली जाईल, अशी ग्वाहीही भोयर यांनी दिली. भोयर म्हणाले, रेल्वेची संख्या वाढवून जास्तीत जास्त लोकल १५ डब्यांच्या करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

उपनगरीय लोकलने दररोज ७५ ते ८० लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. कार्यक्षेत्रातील १७७ रेल्वे स्थानकांवर ६८९९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. रेल्वे पोलिसांच्या मदतीसाठी २ हजार होमगार्ड व १५० एमएसएफ मंजूर करण्यात आले असून त्यापैकी अनुकमे १५२० होमगार्ड व ११२ एमएसएफ हजर आहेत.

  • २०२५ पासून मे २०२६ अखेर तब्बल २ हजार २८८ जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू.

  • गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहता २०२३ मध्ये १८९५, २०२४ - १७४४, २०२५ - १६१२ जणांनी रेल्वे अपघातात जीव गमावला आहे.

  • रेल्वे स्थानकांवर गस्त, व्हिसिबल पोलिसिंग करण्यात येते. संशयित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक साधने, फेसिअल रेकगनिशन सिस्टीम.

  • प्रत्येक स्टेशनवर संशयित बॅगेची तपासणी करण्यात येत आहे. तसेच टर्मिनसच्या ठिकाणी बॅगांची स्कॅनरद्वारे तपासणी करण्यात येते.

  • आपत्कालीन काळात मदत मिळवण्यासाठी १५१२ हेल्पलाईन २४ तास कार्यान्वित. यानुसार १ लाख ५६ हजार तकारी आल्या असून ५३ हजार प्रवाशांना ४ कोटी ३६ लाख परत दिले, अशी माहिती भोयर यांनी यावेळी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT