Poladpur Rain Pudhari
मुंबई

Poladpur Rain: गेल्या वर्षीच्या तुलनेत पोलापुरात कमीच पाऊस

पावसाची ९१४ मि.मी.ने नोंद कमीच; २४ तासांत २५ मि.मी. नोंद

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर: पोलादपूर शहर व तालुक्यात गेल्या २४ तासात फक्त २५ मि. मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती पोलादपूर आपत्ती नियंत्रण कक्षामार्फत प्राप्त झाली आहे. सन २०२५ मध्ये २२ जून पर्यंत ९२५ मी पावसाची नोंद झाली होती ९ मे २०२५ पासून मुसळधार पाऊस कोसळल्याने गतवर्षी जून महिन्याची सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला होता मात्र यावर्षी अवकाळी पाऊस सुद्धा हवातास न झाल्याने व मोसमी मान्सून उशिरा सुरू झालेला पावसाची सरासरी घटली आहे.

उकड्यापासून हैराण झालेल्या पोलादपूर वासियांना पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी अधून मधून पडणाऱ्या एखाद दोन सरीवर वगळता गर्मीचे वातावरण जैसे थे राहिल्याचे दिसून येत आहे पावसाच्या वेळी विद्युत पुरवठा ही खंडित होत असल्याने ग्राहक संताप व्यक्त करत आहे त्यातच मुख्यत ग्राहकांची गर्दी असते त्याच वेळी विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने व्यापारी वर्गात सुद्धा नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गतवर्षी ९ मे पासून पावसाने दमदार सुरवात केली होती मात्र या वर्षी वातावरणातील बदल झाल्याने पावसाचे आगमन लांबणीवर पडले होते दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मे महिन्यात मोफत बियाणे चे वाटप करण्यात आले होते शेतकरी वर्गाने बियाणे सुद्धा विकत घेत शेतीच्या कामाला सुरुवात केली होती मात्र कडक उन्हात रोपांना उभारी न मिळल्याने काही शेतकरी वर्गाला पुन्हा बियाणे ची कामे पूर्ण करावी लागणार आहे.

पावसात गांजवणे मार्गावर मोठा दगड

तालुक्यातील मुख्य मार्ग सह गावातील डोंगर दरी लगत जाणाऱ्या मार्गावर मातीचे ओसरे व दगड खाली येण्याची शक्यता वाढीस लागली आहे. त्यातच शनिवारी झालेल्या पावसात गांजवणे मार्गावर भलामोठा दगड रस्त्याच्या मध्येच पडला होता.

गतवर्षी आपत्ती निवारण मार्फत तात्काळ यंत्रणा घटनास्थळी पोहचत कार्यरत असायची. या वर्षी सुद्धा यंत्रणा कार्यरत असणार आहे, अशी माहिती आपत्ती निवारणतर्फे देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT