Petrol Diesel Price Hike: मध्यपूर्व आशियातील तणापूर्ण स्थितीमुळे भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दर दोन दिवसांना वाढत आहेत. गेल्या काही दिवसात जवळपास ७ रूपयांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पेट्रोल आणि डिझेलचा वापर गरजेपुरताच करावा असे आवाहन देशवासियांना केले होते.
सहसा ज्या वस्तूची किंमत वाढते त्याची मागणी घटते असा अर्थशास्त्राचा लॉ ऑफ डिमांड नियम सांगतो. मात्र पेट्रोल डिझेलच्या बाबतात याचा उलटा परिणाम झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. मात्र किंमत वाढली म्हणून मागणी घटली नाही तर वाढल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल डिझेलच्या सरासरी विक्रीत तब्बल २३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
२३ मे रोजी राज्यातील जिल्हानिहाय किती अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल विकले गेले याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पेट्रोल २३ टक्क्यांनी तर डिझेल ५२ टक्क्यांनी अधिक विकले गेले आहे. काही जिल्ह्यात सरासरीपेक्षा तर १०० टक्क्यांपेक्षा जास्त विक्री झाली आहे. सरासरीपेक्षा १०० टक्क्यांपेक्षा जास्त विक्री वाढलेल्या जिल्ह्यांमध्ये अकोला, नांदेड, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे.
दरम्यान, राज्य सरकारने काहीजण या भाववाढीचा गैरफायदा घेत आहेत. असे सांगत काही भागात पेट्रोल आणि डिझेलची निर्माण झालेली टंचाई ही टंचाई नसून ती साठेबाजी आहे याकडे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांच्या अख्त्यारीत येणाऱ्या गृह विभागाने या साठेबाजांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नागरी पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्तरित्या ही करावाई करणार आहे.