Oil Companies Allegation Pudhari
मुंबई

Oil Companies Allegation: पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर! बुकिंगच्या आडून सरकारी तेल कंपन्यांकडून लूट; इंडियन पेट्रोलियम डीलर्सचा आरोप

डीलर्सवर मात्र बंधने

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर पण आगाऊ बुकिंगच्या आडून सरकारी तेल कंपन्याकडून लूट केली जात असल्याचा आरोप इंडियन पेट्रोलियम डीलर्स संघटनेने केला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती केंद्र सरकार ठरवते. मात्र, जागतिक बाजारपेठेतील घडामोडींवर ते अवलंबून असते. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढतील की नाही, हे सांगणे कठीण आहे.

पेट्रोल आणि डिझेल पुरेसे असले तरी मागणी तितकाच पुरवठा होत आहे. अतिरिक्त साठा करू नका, असे आम्हाला सरकारकडून सांगण्यात आले आहे. पुरेसे इंधन ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो. मात्र, सरकारी तेल कंपन्याकडून इंधन पुरवठ्याच्या बुकिंगसाठी संबंधित कंपन्या या पंप ऑपरेटर्स आणि डीलर्सकडून एक दिवसाचे आगाऊ पैसे घेत असून करोडो रुपये बिनव्याजी वापरत आहेत.

डीलर्सवर बंधने असली तरी सरकारी तेल कंपन्याकडून कमाई सुरू आहे. त्या आपला स्वार्थ साधत आहेत, असा आरोप कॉन्सॉर्टियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्सचे (सीआयपीडी) राष्ट्रीय अध्यक्ष उदय लोध यांनी केला आहे.

एक्सपी, पॉवर प्रकारच्या दरांत वाढ

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 26 मार्चपासून म्हणजे गेले 10 दिवस पेट्रोलचे दर स्थिर आहेत. गेल्या 29 दिवसांपासून डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. मात्र, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) तसेच भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी लिमिटेड (एचपीसीएल) या सरकारी तेल कंपन्यांनी मुंबईत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला एक्सपी 93 आणि पॉवर या प्रीमियम पेट्रोल व्हेरियंटच्या दरात प्रति लीटर 2 ते 2.35 रुपयांनी वाढ केली आहे.

मुंबईतील आजचे दर

पेट्रोल -103.50

डिझेल - 90.03

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT