Parth Pawar Sharad Pawar Silver Oak Visit  Pudhari Photo
मुंबई

Sharad Pawar Parth Pawar meeting : शरद पवारांच्या भेटीसाठी पार्थ पवार पुन्हा एकदा 'सिल्व्हर ओक'वर दाखल

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या जोरदार चर्चा सुरू असतानाच २४ तासांमध्ये दुसऱ्यांदा भेटीचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

Parth Pawar Sharad Pawar Silver Oak Visit :

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव प्रत्यक्षात येईल का याबद्दल जोरदार चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार आज पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत. शनिवारी त्यांची शरद पवारांशी भेट होऊ शकली नाही. आज पुन्हा एकदा ते शरद पवारांना भेटायला सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत.

शनिवारीही केला होता भेटीसाठी प्रयत्‍न

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव प्रत्यक्षात येईल का याबद्दल जोरदार चर्चा सुरू असतानाच या कल्पनेला विरोध करणारे पार्थ पवार शनिवारी 'सिल्व्हर ओक'वर गेले होते. मात्र यावेळी पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतलीच नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पार्थ पवार शरद पवार यांची भेट न घेताच निघून गेले?

सिल्व्हर ओकवर गेल्यानंतर पार्थ पवारांनी प्रतिभा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आजोबा आणि नातवामध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. पार्थ पवार शरद पवार यांची भेट न घेताच निघून गेल्याचे समजते. पार्थ पवार सिल्व्हर ओकवर आले त्यावेळी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक सुरू होती. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, डॉ. अमोल कोल्हे, अनिल देशमुख हे उपस्थित होते. या बैठकीमुळेच पार्थ पवार हे फक्त प्रतिभा पवार यांनाच भेटून सिल्व्हर ओकमधून निघून गेले. त्यामुळेच पार्थ पवार आणि शरद पवार यांची भेट होऊ शकली नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

विलीनीकरणावर राष्‍ट्रवादीच्‍या नेत्‍यांचे मौन

शरद पवार यांच्या भेटीनंतर त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी विलीनीकरणाबद्दल मौन बाळगले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी विलीनीकरण या विषयावर आता आडून किंवा सरळ कोणतेही विधान करू नका असे सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT