राष्‍ट्रवादी काँग्रेस १०० टक्‍के महायुतीतच राहणार : मंत्री हसन मुश्रीफ

'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफांची स्‍पष्‍टोक्‍ती
Pudhari news vikas summit 2024
'पुढारी NEWS' च्‍या 'विचार मान्यवरांचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे' कार्यक्रमात बाेलताना राज्‍याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष साहाय्य मंत्री हसन मुश्रीफ. Pudhari Photo
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्ष हा १०० टक्‍के महायुतीमध्‍येच राहणार आहे, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष साहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (दि.१३) स्‍पष्‍ट केले. ते 'पुढारी NEWS' च्‍या 'विचार मान्यवरांचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे' या कार्यक्रमात ते बोलत होते.

भविष्‍यकाळात महायुती सरकार चांगले काम करेल

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमधून बाहेर पडेल, अशी चर्चा सुरु आहे. याबाबत मंत्री हसन मुश्रीफ म्‍हणाले की, राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्ष हा १०० टक्‍के महायुतीमध्‍येच राहणार आहे. आम्‍ही एकत्रीतच निवडणूक लढविणार आहोत. तेच भविष्‍यकाळात महायुती सरकार चांगले काम करेल, असा विश्‍वासही मुश्रीफ यांनी व्‍यक्‍त केला.

खासगी रूग्णालयातील बिलावर कायदा आणण्याची गरज : हसन मुश्रीफ

राज्यातील खासगी रूग्णालयातील अव्वाच्या सव्वा बिलामुळे रूग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड बसतो. त्यामुळे खासगी रूग्णालयातील बिलावर चाप बसण्यासाठी कायदा आणण्याची गरज आहे, याच्यावर अजून एक उपाय म्हणून प्रत्येक जिल्ह्यातील सरकारी रूग्णालये सक्षम झाली पाहिजेत, असे मतही हसन मुश्रीफ यांनी व्‍यक्‍त केले.

चांगले वैद्यकीय शिक्षण देण्याचा मानस

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण विभागाचा वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगले शिक्षण देण्याचा मानस आहे. राज्यातील शासकीय वसतिगृहात विद्यार्थींची राहणे, जेवणाची सोय शासनामार्फत करण्यात येते. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवणे गरजेचे आहे. सर्व लोकांसाठी एक सुसज्ज रुग्णलय ही व्यवस्था आपण राज्यातील सरकारी रुग्णालयात करत आहोत, यामध्ये ससून, जेजे हॉस्पीटल यांचा समावेश आहे. आरोग्य कायदा, पोलीस, सुरक्षामध्ये चांगली गुंतवणूक केली. तर आपला जीडीपी वाढण्यात मदत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्षी नवीन १० वैद्यकीय रुग्णालय बनवण्यासाठी घोषणा केली आहे. युनानी आणि आयुर्वेदीक, होमोपॅथीक महाविद्यालयांना राज्यात परवानगी दिली आहे. त्यामुळे परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे पाय देशी महाविद्यालयाकडे वळतील, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.