Panvel Karjat Suburban Railway Pudhari
मुंबई

Panvel Karjat Suburban Railway: पनवेल–कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर 85% पूर्ण; एमएमआरमधील प्रवाशांना मोठा दिलासा

29.6 किमी दुहेरी मार्ग, 47 पूल व 3 बोगदे पूर्ण; पनवेल–कर्जत दरम्यान लवकरच सुरू होणार नवी लोकल सेवा

पुढारी वृत्तसेवा

उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे फायदे काय?

हा कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर कल्याण मार्गावरील ताण कमी होऊन सीएसएमटी-कर्जत दरम्यान पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

तळोजा व परिसरातील औद्योगिक क्षेत्रांना चालना मिळून नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार आहे.

वाहतूक कोंडी कमी होऊन कार्बन उत्सर्जनात घट होईल आणि हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित व आरामदायी होणार आहे.

पनवेल : मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प 85 टक्के पूर्णत्वास पोहोचला आहे. आतापर्यंत या मार्गावर तीन बोगदे, 47 पूल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे ही लोकल सेवा लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

29.6 किलोमीटर दुहेरी मार्गाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 2,782 कोटींचा खर्च करण्यात येत आहे. या मार्गावर पनवेल, चिखले, कर्जत अशी पाच स्थानके उभारली जात आहेत. सध्या बोगद्यांतील लाईनिंग, ट्रॅक बसविणे, वीजवाहिनी आणि सिग्नल प्रणालीची कामे वेगाने सुरू आहेत. तळोजा व परिसरातील औद्योगिक क्षेत्रांना चालना मिळून नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT