Panvel Karjat Railway Corridor Trial Pudhari
मुंबई

Panvel Karjat Railway Corridor Trial: पनवेल-कर्जत कॉरिडॉरला गती! नव्या लाईनवर डिझेल इंजिनची चाचणी यशस्वी

पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गावरील नव्या अप लाईनवर डिझेल इंजिनची यशस्वी चाचणी पार पडली.

पुढारी वृत्तसेवा

पनवेल: रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल-कर्जत उपनगरीय मार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या अप लाईनवर डिझेल इंजिनची यशस्वी चाचणी बुधवारी घेण्यात आली.

ही चाचणी चौक, पनवेल यार्ड, चौक, कर्जत, चौक या नव्या मार्गावरील वावर्ले बोगद्यात पार पडली. या ट्रायलसाठी ४०३१२ क्रमांकाच्या ४ डिझेल इंजिनचा वापर करण्यात आला. या यशस्वी चाचणीमुळ पनवेल-कर्जत कॉरिडॉरच्या कामाला मोठी गती मिळणार आहे.

भविष्यात या मार्गावर उपनगरीय रेल्वे सेवा सुरू होण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या प्रकल्पामुळे पनवेल ते कर्जत दरम्यान प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच या मार्गावर नियमित रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT