Pankaja Munde Pudhari
मुंबई

Pankaja Munde | मुंबईतील शासकीय रुग्णालयांमध्ये पर्यावरणपूरक उपाययोजना : मुंडे

उबाठा शिवसेनेचे विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील केएमई, नायर आणि कूपर रुग्णालयात जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य विभाजन (सेग्रिगेशन) व प्रक्रिया यावर भर देण्यात आला असून या रुग्णालयात सेग्रिगेशनची प्रक्रिया व्यवस्थित सुरू असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

उबाठा शिवसेनेचे विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

मुंडे म्हणाल्या, शासकीय रुग्णालयांमध्ये पर्यावरणपूरक आणि आधुनिक सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली उभारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबईतील प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन व पर्यावरणीय निकषांचे पालन होण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जात आहे.

महापालिकेच्या रुग्णालयात ईटीपी, एसटीपी प्रकल उभारणीबाबत प्रशासनाकडून सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानंतर याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असेही मुंडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT