कृष्णप्रकाश 
मुंबई

‘कृष्णप्रकाश सारखा दबंग अधिकारी सरकारच्या संगतीने बिघडला’

backup backup

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कृष्णप्रकाश : पोलिसांचा धाक आणि दरारा कमी पडत आहे. वाढणाऱ्या गुन्हेगारीला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. एनजीओ राजकीय पक्ष पोलीस प्रशासन तज्ज्ञ यांच्याशी व्यापक बैठक घेण्याची गरज आहे. वारंवार घटना घडत असताना काही प्रतिबंधात्मक होत नसेल तर गुन्हा करणाऱ्यांची हिंमत धजावते. कृष्णप्रकाश सारखा दबंग अधिकारी सरकारच्या संगतीने बिघडला असून ते बेताल वक्तव्य करत आहेत, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

सरकारच्याच भावना अधिकाऱ्याच्या तोंडून व्यक्त होतात. बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा राजकारणात सरकारला जास्त रस आहे. सरकार स्वतःच्या भूमिकेशी ठाम नाही. राजकारणाने आरक्षण हा इतकच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या उडालेल्या बोजवाऱ्या बाबत बैठका घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

तत्पूर्वी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्या आणि वाढत्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घाला ही मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे. लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईलचे प्रमाण आणि वेळ वाढला असून यामुळे विद्यार्थ्यांकडून त्यांना मानसिकतेवर परिणाम करणारे आणि समाज विघातक कृत्यांना उत्तेजना देणाऱ्या ॲप्स चा वापर वाढला आहे. यामुळे या सारख्या विकृती वाढवणाऱ्या ॲप वर नियंत्रण ठेवण्याबाबत केंद्र शासनाला कळवले जाईल. हे ॲप लवकरात लवकर बंद करण्याची मागणी केली जाईल.

विघातक कृत्यांना उत्तेजना देणाऱ्या ॲप्सचा वापर वाढला

लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईलचे प्रमाण आणि वेळ वाढला असून यामुळे विद्यार्थ्यांकडून त्यांना मानसिकतेवर परिणाम करणारे आणि समाज विघातक कृत्यांना उत्तेजना देणाऱ्या ॲप्सचा वापर वाढला आहे. यामुळे यासारख्या विकृती वाढवणाऱ्या ॲपवर नियंत्रण ठेवण्याबाबत केंद्र शासनाला कळवले जाईल. हे ॲप लवकरात लवकर बंद करण्याची मागणी केली जाईल असे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

राज्याच्या गृहमंत्र्यांनी महिनाभरात शक्ती कायदा लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दीड वर्ष उलटले तरी अजूनही शक्ती कायदा आणू शकलेले नाही. शक्ती कायद्याची अंमलबजावणी झाली असती तर राज्यात नराधमांचा धाडस वाढलं नसतो. शक्ती कायद्यासाठी आम्ही सरकार सोबत आहोत. कायद्याद्वारे नराधमांची मुस्कटदाबी केली नाही तर स्वैराचार मोठ्या प्रमाणात वाढेल, असे ते म्हणाले.

यासारख्या घटना रोखण्यासाठी कृती आराखडा या शहरासाठी तयार करावा. यात समुपदेशन, तंत्रज्ञान, एनजीओची मदत , खबऱ्यांसारखी यंत्रणा असावी. कल्याण-डोंबिवली अमली पदार्थांच्या विक्रीचे प्रमाण वाढले असून या तरूण-तरुणी व्यसनी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या सगळ्याची माहिती घेऊन महिलांबाबत शहरात वाढलेल्या सुरक्षिततेबाबत सरकारने दिलासा देण्याची आवश्यकता आहे. पोलीस खात्याने पुढाकार घ्यावा असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT