अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करून प्रेयसीची बदनामी File Photo
मुंबई

Mumbai Crime : अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करून प्रेयसीची बदनामी

पोलिसांनी विनयभंगासह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करून प्रेयसीची बदनामी केल्याप्रकरणी चंदन नावाच्या प्रियकराविरुद्ध सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात त्याला पाहिजे आरोपी दाखवण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी रेल्वे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी सांगितले. दरम्यान, हा गुन्हा अंदमानला घडला असून त्याचा तपास स्थानिक पोलिसांकडून रेल्वे पोलिसांकडे सोपविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पीडित महिला 27 वर्षांची असून ती अंदमानला तिच्या कुटुंबियांसोबत राहते.तिचा पहिला विवाह झाला असून कौटुंबिक कारणावरुन तिने तिच्या पतीला घटस्फोट दिला होता. तिला एक मुलगा आहे. ओरिसा येथे नोकरी करताना तिची चंदनशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ते दोघेही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यातून त्यांच्यात अनेकदा शारीरिक संंबंध आले होते. त्यांना एक मुलगी झाली. शारीरिक संबंधाचे त्याने तिचे काही अश्लील फोटो व व्हिडीओ बनविले होते. त्यावरुन त्यांच्यात वाद झाले व तिने त्याच्याशी संबंध तोडून टाकले.

त्यानंतर ती अंदमानला निघून गेली. याच दरम्यान त्याने तिचे अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करून तिच्या बदनामीचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच तिने स्थानिक पोलीस ठाण्यात चंदनविरुद्ध तक्रार केली.तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी चंदनविरुद्ध विनयभंगासह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास नंतर मुंबई रेल्वे पोलिसांच्या सीएसएमटी रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT