Nirav Modi Case pudhari photo
मुंबई

Nirav Modi Case : नीरव मोदीची बहीण माफीचा साक्षीदार?

पीएनबीतील २३,७८० कोटींचा बँक घोटाळा : भावाविरोधात साक्ष देण्याची तयारी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) सुमारे २३ हजार ७८० कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात फरार हिरे व्यापारी नीरव मोदीची बहीण पूर्वी मोदी हिचा जबाब बुधवारी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने नोंदवला. या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. याबाबत सीबीआय निर्णय घेणार आहे.

पूर्वी मोदी ही बेल्जियममध्ये वास्तव्यास आहे. नीरव मोदीविरोधातील प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यासाठी तिने न्यायालयात अर्ज केला होता.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची मागणी फेटाळली होती

पूर्वीने यापूर्वी परदेशात वास्तव्यास असल्याचे कारण देत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदविण्याची परवानगी मागितली होती. मात्र, विशेष सीबीआय न्यायालयाने तिची मागणी फेटाळली होती.

ईडीच्या प्रकरणात आधीच माफीचा साक्षीदार

नीरव मोदीविरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पूर्वी मोदी आणि तिचा पती मयांक मेहता यांना यापूर्वीच माफीचा साक्षीदार केले आहे. मात्र, सीबीआयच्या बँक घोटाळा प्रकरणात त्यांची भूमिका स्वतंत्रपणे तपासली जात आहे.

दरम्यान, पीएनबीच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेतून बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या (एलओयू) माध्यमातून परदेशी बँकांकडून कर्जे मिळवून बँकेची फसवणूक केल्याचा नीरव मोदी आणि त्याच्या सहकाऱ्यांवर आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT