Anganwadi News : राज्यातील अंगणवाड्यांसाठी नवीन अभ्यासक्रम, ३ ते ६ वयोगटातील बालकांकरिताही असणार पुस्तके  File Photo
मुंबई

Anganwadi News : राज्यातील अंगणवाड्यांसाठी नवीन अभ्यासक्रम, ३ ते ६ वयोगटातील बालकांकरिताही असणार पुस्तके

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून अंमलबजावणी हाेणार

पुढारी वृत्तसेवा

New Curriculum for Anganwads in the State

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील अंगणवाड्यांतील पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेत आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्यातील अंगणवाड्यांमध्ये तीन वर्षांच्या 'बालवाटिका' अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल ३० लाख बालकांच्या शालेय शिक्षणाच्या प्राथमिक पायाभरणीत एकसंधता निर्माण होणार आहे.

राज्यात सध्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत १ लाख १० हजार ६३१ अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यामध्ये ३ ते ६ वयोगटातील सुमारे ३० लाख बालकांना पोषण, आरोग्य, लसीकरण, शिक्षण व इतर मूलभूत सेवा दिल्या जातात. या बालकांसाठी आधी 'आकार' हा अभ्यासक्रम कार्यान्वित होता, परंतु आता तो बदलून 'आधारशिला' हे राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त मॉडेल लागू करण्यात आले आहे. महिला व बाल विकास नवीन अभ्यासक्रमासह राज्य शासनाने अंगणवाड्यांचे स्थानिक पातळीवर स्थानांतर करून शाळांशी समन्वय साधण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, ज्या शाळांमध्ये रिकाम्या किंवा अतिरिक्त वर्गखोली आहेत, तिथे अंगणवाड्या हलवण्यात येतील. यामुळे अंगणवाडीतील बालकांना शालेय वातावरणाशी परिचय होईल आणि स्थानिक पातळीवरील प्रशासनास व्यवस्थापन सुलभ होईल अशी रचना होणार आहे.

मंत्रालय, भारत सरकार यांनी विकसित केलेल्या 'आधारशिला' अभ्यासक्रमाच्या द्वाच्यावर आधारित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेल्या 'आधारशिला बालवाटिका १, २ व ३' असा अभ्यासक्रम ३ ते ६ वयोगटातील बालकांकरिता तयार केला आहे. या अभ्यासक्रमांची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू केली जाणार आहे. याकरिता आवश्यक प्रशिक्षण साहित्य, मार्गदर्शक पुस्तिका, आणि पूरक महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर विकसित मोबाईल अॅपच्या माध्यमातून राज्यातील सर्व अंगणवाड्यांचे 'जीओ टॅगिंग' करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व अचूकता येईल. या निर्णयामुळे कोणतीही अंगणवाडी दुर्लक्षित राहणार नाही, याचीही दक्षता घेतली जाणार आहे.

साहित्य अंगणवाडी सेविकांना व पर्यवेक्षकांना वेळोवेळी पुरवले जाणार आहे.

नवीन अभ्यासक्रमातील महत्त्वाचा भाग म्हणजे तो शिक्षणाला खेळाशी जोडतो. 'जादुई पिटारा', 'ई-जादुई पिटारा', आधारशिला किट्सचा अभ्यासात वापर यांसारख्या खेळणी आधारित शिक्षणसामग्रीचा वापर अंगणवाड्यांमध्ये करण्यात येणार आहे. यामुळे बालकांचे संज्ञानात्मक, सामाजिक, भावनिक व शारीरिक विकासाचे उद्दिष्ट सुलभ होईल.

  • अंगणवाड्यांमधील ३ ते ६ वयोगटातील बालकांसाठी 'आधारशिला बालवाटिका' अभ्यासक्रम लागू.

  • २०२५-२६ पासून शैक्षणिक वर्षात अंमलबजावणी.

  • सुमारे ३० लाख बालकांना शिकवला जाणार अभ्यास जादुई पिटारा, ई-पिटारा, नवचेतना यांसारखे शिक्षण साहित्य वापरण्यावर भर

  • अंगणवाडी सेविकांना नवीन प्रमाणपत्र प्रशिक्षणाची सोय

प्रायोगिक वापरानंतर वर्षभरात मूल्यांकन

इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्याच्या आधीच 'शाळेसाठी तयार' होतील, असा उद्देश या अभ्यासक्रमामागे आहे. या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करताना सुरुवातीस निवडक अंगणवाड्यांमध्ये प्रायोगिक स्वरूपात कृतीपुस्तिका, प्रगती पुस्तिका आणि पूरक साहित्य वापरण्यात येणार आहे. यानंतर त्याचे मूल्यमापन करण्यात येईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांशी संलग्न अंगणवाड्यांमध्ये या उपक्रमाची प्रायोगिक अंमलबजावणी होणार आहे. अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करताना अंगणवाडी सेविकांना नियमित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण व महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त सहकायनि राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर एनसीईआरटी, एससीईआरटी, डायट यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यशाळा राबवण्यात येतील. विशेषतः खेळाधारित शिक्षणपद्धतीवर भर असलेल्या या प्रशिक्षणात सेविका, मदतनीस व पूर्वप्राथमिक शिक्षक सहभागी करुन घेतले जाणार आहे.

बारावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांना ६ महिन्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र तर बारावीपूर्व शिक्षण घेतलेल्या सेविकांसाठी एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स (प्रशिक्षण प्रमाणपत्र) राबवण्यात येईल. हे प्रशिक्षण एससीईआरटीच्या समन्वयाने दिले जाणार आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांची माहिती महिला व बाल विकास विभागाने तातडीने संबंधित संस्थेला द्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT