NCP Merger Pudhari
मुंबई

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी मविआत परत आले तर ते खरे विलीनीकरण

काँग्रेस नेत्यांचा सूर, स्व. अजित पवार यांच्या दाव्याचा दाखला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे; पण ते भाजपसोबत राहून विलीनीकरण करणार असतील, तर आमचा त्याला पाठिंबा नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली, महाविकास आघाडीत परत आले तरच खरे विलीनीकरण असेल आणि त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल, असा सूर प्रदेश काँग्रेसचे नेते लावत आहेत.

अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. ही फक्त तब्येतीची विचारपूस करण्यासाठीची भेट नाही, हा मोठा राजकीय प्लॅन आहे, असे प्रदेश काँग्रेसचे नेते सांगत आहेत.

अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडणार होते. भाजपबरोबर त्यांचे जमणार नव्हते. ते २०२८ मध्‍ये आपण बाहेर पडणार आहोत, एकत्रित आल्याशिवाय पर्याय नाही, असे अजित पवार यांनी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांना सांगितले होते, असे दावे आता काँग्रेसचे नेते करत आहेत.

अजित पवार मुख्यमंत्री होणार होते. महायुती सोडून, शरद पवार राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे शिवसेना यांच्यासोबत जाऊन सरकार बनवण्याचा त्यांचा प्लॅन होता, असा या नेत्यांचा दावा आहे.

काँग्रेस विलीनीकरणाच्या विरोधात नाही; पण...

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे; पण ते भाजपसोबत राहून विलीनीकरण करणार असतील, तर आमचा त्याला पाठिंबा नाही. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली, महाविकास आघाडीत परत आले तरच खरे विलीनीकरण असेल, अशी काँग्रेसची भूमिका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT