Chhath Puja Mumbai : छठपूजेसाठी रेल्वेस्थानकांवर भोजपुरी गाणी

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना-मनसे आक्रमक
Bhojpuri Songs Controversy
Bhojpuri Songs Controversypudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : छठपूजेच्या निमित्ताने मुंबईतील रेल्वेस्थानकांवर भोजपुरी गाणी वाजविण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाऊबीजेच्या दिवशी आंबिवली, वडाळा, सानपाडा आणि नेरूळ यांसह काही रेल्वेस्थानकांवर भोजपुरी गाणी ऐकविण्यात आल्याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर ठाकरे शिवसेना आणि मनसेने आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी रेल्वे प्रशासनाला लक्ष्य केले आहे.

'सण साजरे करण्यास आमचा विरोध नाही. आम्हीही इतरांच्या सणांमध्ये सहभागी होतो. मात्र, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचे राजकारण मुंबईच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर आणू नका. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,' असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला. मुख्यमंत्री आणि मुंबईच्या महापौरांनीही या विषयावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Bhojpuri Songs Controversy
Girls Self Defense Training : मुलींचे स्वसंरक्षण प्रशिक्षण शाळांमध्ये कधी? अंमलबजावणी रखडली

रेल्वेस्थानकांवर महाराष्ट्र दिन, शिवजयंतीसारख्या प्रसंगांसाठी मराठी गाणी ऐकवायची असतील, तर त्यासाठी अर्ज करावे लागतात. मग छठपूजेच्या निमित्ताने भोजपुरी गाणी वाजविण्याचे आदेश कसे देण्यात आले, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.

नवी मुंबईतही मराठी माणसेच राहतात : भाजप

मुंबईचे महत्त्व कुणीही कमी करत नाहीये. नवी मुंबई काही पाकिस्तान किंवा बांगलादेशात नाही. नवी मुंबईतही मराठी माणसे आणि महाराष्ट्राचेच लोक राहतात. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होत असेल तर त्यातून कुठेही मुंबईचे महत्त्व कमी होत नाही, अशा शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले.

तुम्ही मुंबईचे महत्त्व कमी करून मुंबईतल्या मराठी माणसाला कल्याण-डोंबिवलीपासून थेट खारघरपर्यंत स्थलांतरित केले. प्रत्येक बाबतीत विरोधाचा अजेंडा राबवत मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अशी भूमिका घेतली जाते. संजय राऊत, कुणाचा बाप, आजोबा आला तरीही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही आणि मुंबईचे महत्त्वही कमी होणार नाही, असे बन यांनी सांगितले.

Bhojpuri Songs Controversy
Mumbai Rent Agreement Rules : करार संपल्यानंतरही घर न सोडणाऱ्यांना पोलीस काढणार घराबाहेर

चाळीतल्या लोकांची घरे लाटली, त्याबद्दल आधी उत्तर द्यावे, असे आव्हानही बन यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळीतल्या लोकांना त्याचठिकाणी हक्काची घरे दिली. उद्धव ठाकरे मात्र कॅमेऱ्यासमोर उद्योगपतींना विरोध करतात आणि त्याच उद्योगपतीच्या घरी लमात जाऊन नाच करणे, रेड कार्पेट टाकून त्यांचे स्वागत करणे, ही उबाठा गटाची परंपरा राहिली आहे, अशी टीका बन यांनी केली.

मनसेने घाटकोपर रेल्वे कार्यालयात वाजवले राज्यगीत

घाटकोपर : मुंबईत रेल्वे स्थानकांवर छठपूजेची भोजपुरी गीत वाजवल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वतीने गुरुवारी घाटकोपर रेल्वे स्थानकात आणि स्टेशन अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये महाराष्ट्राचे राज्यगीत वाजविण्यात आले, तसेच त्यांना राज्यगीताच्या प्रति देण्यात आल्या. छठपूजा गीत रेल्वे स्थानकांत रेल्वे प्रशासनाने वाजविण्याचा निषेध या ठिकाणी करण्यात आला. मनविसेनेचे पदाधिकारी अभिषेक सावंत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

पुन्हा भोजपुरी गीत वाजल्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मनसेने दिली, तर आम्ही वरिष्ठांना कळविले असून आता पुन्हा ती गाणी वाजाविण्यात येणार नाही, राज्यगीत वाजविण्याबाबत आपण वरिष्ठांना कळविले असल्याचे रेल्वे अधिकारी कृष्ण अवतार शर्मा यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.