NCMC CARD pudhari
मुंबई

NCMC CARD: बायोमेट्रिकमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे जुळत नसतील तर पर्याय काय?

Anirudha Sankpal

NCMC CARD News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) एनसीएमसी कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. प्रवाशांना सवलतीचा लाभ अधिक सुलभपणे मिळावा यासाठी प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

मोबाईल OTP ची सोय

ज्या अमृत ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांच्या बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे जुळत नाहीत, त्यांना २१ सप्टेंबर २०२६ पासून आधारकार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकावर प्राप्त ओटीपीद्वारे एनसीएमसी कार्डची नोंदणी करता येणार आहे.

हरवलेले अथवा चोरीला गेलेले एनसीएमसी कार्ड ब्लॉक करून १९९ रुपये शुल्क भरून नव्याने नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

कार्ड वितरण कधी होणार

१९ सप्टेंबरपर्यंत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबरपासून कार्ड वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

१६ सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या सवलतधारकांना क्यूआर कोड असलेली पावती देण्यात येणार असून, ती एसटीच्या ईटीआयएम मशीनवर स्कॅन केल्यानंतर सवलतीचे तिकीट मिळणार आहे. ही पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार असून, या कालावधीत एनसीएमसी कार्ड ॲक्टिव्ह करून त्यामध्ये टॉप-अप करणे आवश्यक आहे.

एसटी महामंडळाचे आवाहन

सवलतीच्या प्रवासाचा लाभ अखंडितपणे मिळण्यासाठी सर्व संबंधित सवलतधारकांनी तातडीने #एनसीएमसी कार्ड नोंदणी करून घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT