Bank File Photo
मुंबई

NBFC HFC Loan Growth: बँकांशिवायचा कर्जपुरवठा १४ टक्क्यांनी वाढला; जून महिन्यात एकूण पतपुरवठा गेला तब्बल ५९ लाख कोटींवर

एनबीएफसीच्या कर्ज वितरणात गृह, वाहन आणि वैयक्तीक अशा किरकोळ श्रेणीतील कर्जाचा वाटा सर्वाधिक आहे. या श्रेणीतील कर्ज वितरण २०.३ टक्क्यांनी वाढून २५.६२ लाख कोटी रुपयांवर गेले आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या (एनबीएफसी) आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचे (एचएफसी) कर्ज वितरण गत वर्षीच्या तुलनेत जून महिन्यात १४.४ टक्क्यांनी वाढून ५९.३१ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. किरकोळ, सेवा आणि कृषी क्षेत्रासह सर्व प्रकारच्या कर्जांना चांगली मागणी असल्याचे यावरून दिसून येते.

एनबीएफसीच्या कर्ज वितरणात गृह, वाहन आणि वैयक्तीक अशा किरकोळ श्रेणीतील कर्जाचा वाटा सर्वाधिक आहे. या श्रेणीतील कर्ज वितरण २०.३ टक्क्यांनी वाढून २५.६२ लाख कोटी रुपयांवर गेले आहे.

यात गृह कर्ज वितरण ११.४ टक्क्यांनी वाढून ८.४४ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. वाहन कर्ज १५.२ टक्क्यांनी वाढून ६.२४ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. याशिवाय दौनंदिन वापराच्या वस्तूंसाठी दिले जाणारे कर्ज तब्बल ४६.८ टक्क्यांनी वाढून ७२,२०१ कोटी रुपयांवर गेले आहे.

कृषी, सुवर्ण तारण कर्जात वाढ...

एनबीएफसीने कृषी आणि कृषीपूरक प्रकल्पांसाठी ७९,६८४ कोटी रुपयांचा पतपुरवठा केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १७.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. सुवर्ण तारण कर्ज ६९.३ टक्क्यांनी वाढून ३.४१ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. एकूण किरकोळ कर्ज वितरणामध्ये सुवर्ण तारण कर्जाचा वाटा तब्बल १३.३ टक्क्यांवर गेला आहे. गतवर्षी हे प्रमाण ७.७ टक्के होते.

सेवा क्षेत्राला दिलेले कर्ज १७.६ टक्क्यांनी वाढून ७.७० लाख कोटी रुपयांवर गेले आहे.व्यावसायिक रिअल इस्टेटचे कर्ज वितरण ३३.८ टक्क्यांनी वाढून १.११ लाख कोटी रुपयांवर गेले आहे.

व्यापाराला दिला जाणारा पतपुरवठा १७.१ आणि वाहतूक व्यवसाय करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जामध्ये ९.८ टक्क्यांची वाढ झाली आहे.औद्योगिक कर्ज वितरण ६.७ टक्क्यांनी वाढून २२.०४ लाख कोटी रुपयांवर गेले आहे.

त्यात पायाभूत सुविधांना दिलेल्या कर्जाचा वाटा २०.०९ लाख कोटी रुपये इतका प्रचंड आहे.याशिवाय विद्युत क्षेत्राचा पत पुरवठा ४.९ टक्क्यांनी वाढून १४.२६ लाख कोटी रुपयांवर गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT