Child Swallowed Magnet: खेळण्यातील छोटे चुंबक ठरले जीवघेणे; २ वर्षीय चिमुकल्याने गिळले चुंबक

चुंबक गिळल्याने चिमुकल्याच्या आतड्यांना छिद्रे
Child Swallowed Magnet
Child Swallowed MagnetPudhari
Published on
Updated on

मुंबई: खेळण्यांमध्ये वापरले जाणारे छोटे चुंबक लहान मुलांसाठी जीवघेणे ठरू शकते, याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दोन वर्षांच्या चिमुकल्याने दोन निओडिमियम चुंबक गिळल्याने लहान, मोठ्या आतड्यांना छिद्रे पडली.

या मुलाला सुरुवातीला ताप, पोटात कळा, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत होता. त्यामुळे पोटाचा संसर्ग झाल्याचा संशय होता. मात्र, ताप कायम राहण्यासह पोटाच्या उजव्या खालच्या भागात तीव्र वेदना होत असल्याने पुढील तपासण्या करण्यात आल्या.

Child Swallowed Magnet
Mahim POCSO Case: माहीममध्‍ये तेरा वर्षांच्या शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्ट्रासाऊंडमध्ये अपेंडिसायटिसचा संशय आल्याने मुलाला तातडीने शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. मुलाने चुंबक गिळल्याची माहिती पालकांना नव्हती. उपचारानंतर घरी खेळणी तपासली असता एका खेळण्यात याच प्रकारचे चुंबक असल्याचे आढळून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news