School closed Navi Mumbai  
मुंबई

School closed Navi Mumbai : मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील शाळांना दुपारच्या सत्रात सुट्टी जाहीर

सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाकडून अतिवृष्टीच्या इशारा देण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आज दुपारच्या सत्रातील सर्व व्यवस्थापनाचा सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

तसेच सकाळचे सत्र आणि सर्वसाधारण सत्र सुरू असलेल्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पालकांना तात्काळ सूचना देऊन सर्व विद्यार्थ्यांना केवळ पालक अथवा अधिकृत स्कूल बस अधिकृत प्रतिनिधी यांच्या ताब्यात देऊन शाळा सोडण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिल्याची माहिती शिक्षण उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी दिली. सर्व शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देऊन वरील सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

शहरात 23 ठिकाणी झाडे कोसळली. 24 तासात 103.53 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मोरबे धरणाची पातळीत वाढ होत असून 70.12 मीटर (28.09 %) पाणीसाठा शिल्लक आहे.

24 तासात झालेल्या पावसाची आकडेवारी

बेलापूर.128 मिमी

नेरुळ.20 मिमी

वाशी 76.60 मिमी

कोपरखैरणे106.40 मिमी

ऐरोली - 103.80 मिमी

दिघा- 129.20 मिमी

  • सरासरी 103.53 मिमी

  • आतापर्यंत एकूण पाऊस - 728.37 मिमी

मोरबे धरण

  • आजचा पाऊस 101.00 मिमी

  • एकूण पाऊस धरणक्षेत्र 1जून ते आतापर्यंत झालेला पाऊस 526.20 मिमी

  • धरणाची पातळी 70.12 मीटर (28.09 %)

  • झाडे पडली - 23

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT