Sanpada hotel cylinder blast Pudhari photo
मुंबई

Navi Mumbai Sanpada hotel cylinder blast | सानपाड्यात हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट; दोन कामगार जखमी

Navi Mumabai - सानपाड्यात हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट; दोन कामगार जखमी

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : सानपाडा येथे एका हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात दोन कामगार जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने परिसरातील आजूबाजूच्या घरांमधील तसेच कार्यालयांमधील काचा फुटल्या. स्फोटाचा आवाज तब्बल एक किलोमीटरपर्यंत ऐकू गेल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू असून, स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT