accident news pudhari photo
मुंबई

Navi mumbai road accidents : नवी मुंबईत बारा वर्षांत ३४४० जणांचे अपघाती बळी

वाहानांचा भरधाव वेग उठतोय वाहनचालक व प्रवाशांच्या मुळावर

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : महामार्ग, पामबीच रोडसह शहरातील रस्ते मृत्यूचे सापळे ठरू लागले आहेत. अतिवेगाने वाहने चालवल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. गेल्या बारा वर्षांत ६२५५ अपघात झाले आहेत. यामधील ३४४० अपघातांमध्ये चालक किंवा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हा प्राणाघातक अपघात पामबीच मार्ग, बेलापूर उरण, बेलापूर जेएनपीटी, सायन-पनवेल आणि ठाणे-बेलापूर आणि कळंबोली शिळफाटा मार्गावर झाले आहेत.

पामबीच रोडवर गेल्या महिन्यात मध्यरात्री अतिवेगामुळे कारचा अपघात झाला. यात दोन गंभीर जखमी झाले तर ठाणे-बेलापूर रोडवर एनएमएमटीच्या बसचा अतिवेगाने अपघात झाला. यामध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सायन-पनवेल महामार्ग, ठाणे बेलापूर रोड, उरण महामार्ग, पामबीच रोड, गोवा महामार्गासह अनेक प्रमुख रस्ते आहेत.

तळोजा व ठाणे बेलापूर या दोन औद्योगिक वसाहती, कळंबोली पोलाद बाजार तर उरण तालुक्यात रेती, खाडीच्या कॉॅऱ्यांचे मोठे जाळे आहे. येथून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होते. प्रमुख मार्ग अपघाताचे सापळे झाले असून या परिसर रोज किमान एक तरी दखलपात्र अपघात होत आहे. प्रत्येक तीन दिवसांत दोघांचा मृत्यू होत आहे.

जवळ जेएनपीटी बंदर असल्यामुळे कंटेनरसारख्या अवजड वाहनांचे प्रमाणही जास्त आहे. एमआयडीसीतही अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पामबीच मार्गावर दिवसाआड एक गंभीर अपघात होता. सायन-पनवेल मार्गावर तुर्भे जंक्शन, सानपाडा, वाशी ब्रीजवर अपघातांची मालिका सुरूच असते. तर ठाणे-बेलापूर मार्गावर ऐरोली नाका, दिघा, कोपरखैरणे, घणसोली, तुर्भेनाका, नेरूळ एलपी जंक्शन व उरण फाटा येथेही प्राणाघातक अपघात होत असतात. उरण-पनवेल मार्गावर अशाच प्रकारे अपघातांचे सत्र आहे. कळंबोली, शिळफाटा दरम्यानही हीच स्थिती आहे. पूर्वी पामबीच रोड व महामार्गावरच अतिवेगाने अपघात होत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT