Mumbai Crime : नजर हटताच चोरी; दुचाकीवरून क्षणात पलायन!

दोन अंकांनी तपासाला दिशा; ४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून चोरांचा माग
chain snatching
chain snatchingpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : महेश पांचाळ

काही सेकंदांची नजर... संधी मिळताच झडप... आणि त्यानंतर दुचाकीवरून सुसाट पलायन! मुंबईत अलीकडे घडलेल्या सोनसाखळी आणि बॅग हिसकावण्याच्या घटनांतून चोरांची हीच कार्यपद्धती समोर आली आहे. सांताक्रूझमध्ये लकवाग्रस्त वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावणाऱ्या तरुणाला २४ तासांत अटक झाली.

पवईत पीडित महिलेने लक्षात ठेवलेल्या दुचाकीच्या क्रमांकातील दोन अंकांमुळे तपासाला दिशा मिळाली. तर वांद्रेतील बॅग हिसकावण्याच्या घटनेत आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तब्बल ४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, त्यामुळे चोरे नेमके कोणाला लक्ष्य करतात, आधी परिसराची पाहणी करतात का आणि चोरीनंतर कोणता मार्ग वापरतात, याचा तपास महत्त्वाचा ठरत आहे.

chain snatching
Ganeshotsav mumbai 2026 : सर्वाधिक २९ शतकोत्तरी गणेश मंडळे गिरगावात

रस्त्यावर मोबाईलमध्ये गुंग असलेले नागरिक, हातात बॅग घेऊन एकटे चालणारे तसेच अंगावर सोन्याचे दागिने असलेल्या व्यक्तींना हेरून संधी मिळताच हल्ला केला जात असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांना काही घटनांत शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासावे लागले.

भोजपुरी चित्रपटात भूमिका; आर्थिक अडचणीतून चोरीचा आरोप

सांताक्रूझ पूर्वेतील सिद्धार्थनगर येथे २० सप्टेंबरला लकवाग्रस्त वृद्ध महिलेची २१ ग्रॅमची सोनसाखळी हिसकावण्यात आली. आशिष अतरचंद शर्मा (२९) याने चाळीतील घरात प्रवेश करून महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याचा आरोप आहे. चेहरा रुमालाने झाकून तो पसार झाला.

घटनास्थळी सीसीटीव्ही किंवा प्रत्यक्षदर्शी नसल्याने पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र, महिलेने दिलेल्या वर्णनाच्या आधारे आजूबाजूच्या गल्ल्यांतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात संशयित वेश बदलून परिसरात फिरताना दिसला. त्याचा फोटो घेऊन पोलिसांनी स्थानिक माहितीदारांच्या मार्फत शोध सुरू केला. अखेर यशवंतनगर येथील श्यामसुंदर चाळीतून शर्मीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीची सोनसाखळी जप्त करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, शर्मीने भोजपुरी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. आर्थिक अडचणीमुळे चोरी केल्याचे त्याने चौकशीत सांगितल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दोन अंक ठरले महत्त्वाचे

पवईतील ६ सप्टेंबरच्या घटनेत मोबाईलवर गुगल मॅप पाहत असलेल्या महिलेची सुमारे २.२५ लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी हिसकावली. या वेळी महिलेने दुचाकीच्या क्रमांकातील शेवटचे दोन अंक लक्षात ठेवले. हे दोन अंक पोलिसांसाठी महत्त्वाचा धागा ठरले. त्याआधारे सुमारे १०० ते १२५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. आरोपी कोणत्या मार्गाने गेला, कुठे वळाला, याचा माग काढत पोलिसांनी त्याला पकडले. या तपासातून चोरीचे आणखी चार गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

chain snatching
New sub divisional offices maharashtra : चार अपर जिल्हाधिकाऱ्यांसह ४७ नवीन अपर तहसील कार्यालये : महसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय

४०० कॅमेऱ्यांतून माग काढला

वांद्रेत १४ सप्टेंबरला ६२ वर्षीय महिलेची बॅग दोन दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी हिसकावल्याचा आरोप आहे. या झटापटीत महिला रस्त्यावर पडून जखमी झाली. बॅगिंत सुमारे १.५ लाख रुपये किमतीचा मोबाईल होता. दुचाकीचा क्रमांक स्पष्ट नसतानाही पोलिसांनी एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. त्यानंतर वांद्रे, माहिम, दादर, शीव, माटुंगा, वडाळा टी.टी. आणि चेंबूरपर्यंत तब्बल ४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. संशयितांच्या हालचालींचा सलग माग काढत पोलिसांनी चार जणांना अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news