मुंबई

स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई ‘लय भारी’; ठरले देशातील तिसरे स्वच्छ शहर

मोहन कारंडे

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : 'स्वच्छ सर्वेक्षण 2023' मध्ये नवी मुंबईस देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान मिळाला. तर राज्यात पहिला क्रमांक पटकवला आहे. यावर्षी इंदोर आणि सुरत शहरांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला असून त्यानंतर नवी मुंबईचाच क्रमांक आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला. महाराष्ट्र राज्यात नंबर वन कायम कचरामुक्त शहराचे सर्वोच्च 'सेव्हन स्टार' मानांकन मिळविणाऱ्या देशातील केवळ २ शहरांमध्ये एक शहर तसेच हे मानांकन मिळविणारे राज्यातील एकमेव शहर ठरले. ओडीएफ कॅटेगरी'त सर्वोच्च 'वॉटरप्लस' मानांकनही कायम राखले आहे. या बहुमानात लोकप्रतिनिधी, स्वच्छताप्रेमी नागरिक, स्वच्छताकर्मी, महापालिका अधिकारी-कर्मचारी, प्रसारमाध्यमे यांच्या सक्रिय सहभागाचे मोठे योगदान असल्याचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT