नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नवी मुंबईतील 28 प्रभागांत ऐरोलीसह तुर्भे विभाग आघाडीवर राहिला आहे. पहिल्या दहा नगरसेवकांच्या यादीत भारतीय जनता पक्षाच्या पाच व शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील वर्चस्व सिद्ध केले आहे. यात उपनेते विजय चौगुले, शुभम चौगुले, माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, शुभांगी पाटील, अंजली वाळुंज यांच्यासह दहाजणांचा समावेश आहे.
निवडणुकीत सर्वाधिक मते हे शिवसेनेचे(शिंदे गट) उमेदवार असलेले शुभम चौगुले (प्रभाग 1) यांना सर्वाधिक म्हणजे तब्बल 13,916 मते मिळाली आहेत. तर पहिल्या 10 मध्ये शिवसेना (शिंदे गट) व भारतीय] जनता पक्ष या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी 5 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते विजय चौगुलेंसह प्रभाग क्रमांक 2 मधील तीन उमेदवारांनी (गौरी आंग्रे, श्वेता काळे व विजय चौगुले) यांनी सर्वाधिक मताधिक्य घेत पहिल्या दहा जणांमध्ये स्थान मिळवले आहे.
माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी व शुभांगी पाटील यांनीही तब्बल बारा हजारहून अधिक मते घेत आपापल्या प्रभागांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.