Chhatrapati Shivaji Maharaj Statue: आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषक दिन असून याचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल १ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'रायगड जिल्ह्यातील या विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असलाच पाहिजे असं मी मागं म्हटलं होतं. त्याप्रमाणे हा पुतळा उभारण्यात आला आहे. आता देशी परदेशी प्रवाशांना या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे पाहून ऊर्जा घेता येईल.'
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महाराष्ट्राच्या विकासाचे नवे प्रतीक मानले जात असून येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याने स्वराज्याचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्राची प्रगती यांचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे. देश-विदेशातून येणाऱ्या लाखो प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडून प्रेरणा घेता येणार आहे.
आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षणांची आठवण करून देणारा... कारण आजच्याच दिवशी, ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळाली. शतकानुशतके स्वराज्याच्या विचारांना प्रेरणा देणारा हा दिवस दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात 'शिवराज्याभिषेक दिन' म्हणून मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला जातो.
याच ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण आज करण्यात येणार आहे. विमानतळाच्या टर्मिनल-१ येथे आयोजित या विशेष सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महाराष्ट्राच्या विकासाचे नवे प्रतीक मानले जात असताना, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याने स्वराज्याचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्राची प्रगती यांचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे. देश-विदेशातून येणाऱ्या लाखो प्रवाशांचे स्वागत आता शिवरायांच्या प्रेरणादायी प्रतिमेने होणार आहे.