Crime News Pudhari
मुंबई

Crime News: पाणी वितरण करता करता ड्रग्ज वितरण; दोघांना अटक

11 लाख 60 हजारांचे एमडी जप्त

पुढारी वृत्तसेवा

कोपरखैरणे: कोपरखैरणे परिसरातून दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेत झडती घेतली असता त्यांच्याकडे 11 लाख 60 हजार रुपयांचे एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाची भुकटी आढळून आली. त्या दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स पथकाने केली.

मोहम्मद फैज अली खान (वय 24) आणि अल्ताफ मुन्ना शेख असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यातील मोहम्मद फैज हा कोपरखैरणे भागात स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे कॅन वितरण करणारा आहे तर अल्ताफ बेरोजगार आहे.

अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स विभागाला कोपरखैरणे भागात एमडी वितरण करण्यासाठी काही युवकांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कोपरखैरणे भागात गस्त सुरु होती.

58 ग्रॅम वजनाची एमडी पावडर

29 तारखेला मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास गस्त घालत असताना सेक्टर 9 येथून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर दोन युवक संशयास्पदरित्या जात असताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 58 ग्रॅम वजनाची एमडी पावडर आढळून आली. पथकाने तात्काळ त्यांना अटक केली व कोपरखैरणे पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कलमान्वये गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT