Nalasopara fire news
मुंबई: नालासोपारा-वसई लिंक रोडवरील इम्पीरियल हाईट्स या उंच इमारतीच्या १४ व्या मजल्यावर मंगळवारी रात्री भीषण आग लागली. यामध्ये दोन महिलांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. सुमारे १५ जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली, तर अनेक रहिवाशांनी स्वतःहून खाली उतरून जीव वाचवला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
फाल्गुनी शाह (वय ५०) आणि अश्विनी पारकर (वय ५०) अशी मृत महिलांची नावे आहेत. वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले की, या घटनेची माहिती रात्री ११:३० च्या सुमारास मिळाली. त्यानंतर अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासकीय पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. आगीमुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. अनेकांनी स्वतःहून खाली उतरून जीव वाचवला, तर काही जण मदतीच्या प्रतीक्षेत इमारतीच्या बाहेरील बाजूला लटकून राहिले.
दरम्यान, आगीपासून बचाव करण्यासाठी काही रहिवासी इमारतीच्या बाहेरील बाजूला लटकून राहिले होते. मदतीची प्रतीक्षा करत त्यांना तब्बल ४० ते ४५ मिनिटे जीव मुठीत धरून काढावी लागली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या क्रेनच्या सहाय्याने अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
अनधिकृत इमारती, झोनिंग न पाहता झालेले बांधकाम आणि बेकायदेशीर फ्लॅट विक्रीला आळा घालण्यासाठी अनधिकृत बांधकामांच्या दस्तांची नोंदणी तत्काळ थांबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व दुय्यम निबंधकांना नवीन नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले.
मुंबई मेट्रोपॉलिटन विभाग ( एमएमआर ), ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, हवेली, मुळशी, नागपूर यांसह राज्यातील विविध शहरांमधील सबर्बन भागांत रहिवासी झोन नसताना इमारती उभारणे, 'रेरा' नोंदणी न करणे आणि मंजूर क्षेत्रापेक्षा जास्त बांधकामाची विक्री करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले होते.