मुंबई : ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीच्या रहिवाशांना घरांचा ताबा मिळण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. डिसेंबरमध्ये ताबा मिळणे अपेक्षित होते मात्र काही कामे शिल्लक असल्याने आता फेब्रुवारीत 557 रहिवाशांना ताबा दिला जाणार आहे.
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबईतील वरळी, ना. म. जोशी मार्ग-परळ, नायगाव येथील सुमारे 86 एकरवर वसलेल्या सुमारे 207 चाळींचा समावेश आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे 15 हजार 593 रहिवाशांचे पुनर्वसन केले जात आहे. ना. म. जोशी मार्ग-परळ प्रकल्पामध्ये 2 हजार 560 निवासी व अनिवासी गाळे असून 14 पुनर्वसन इमारती बांधल्या जात आहेत. पुनर्वसन इमारतींना जानेवारीत भोगवटा प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ताबा देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.