Municipality shows mercy to contractors who do poor quality work!
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई महानगरात मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे करण्यात आली. मात्र महापालिकेच्या जी. उत्तर विभागातील 8 रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांपैकी केवळ 6 रस्त्यांची कामे पूर्ण केलेल्या कंत्राटदारालाच पालिकेने शिल्लक राहिलेल्या निधीतून अन्य दोन रस्त्यांची कामे दिली आहेत.
तत्पूर्वी या कंत्राटदराने केलेल्या कामांपैकी काही रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने त्याच्याकडून या रस्त्यांची कामे पुन्हा करून घेण्यात आली होती. त्यामुळे या कंत्राटदारावार पालिका एवढी मेहेरबान का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने जी उत्तर विभागातील 8 रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली होती. यासाठी महापालिकेने मेसर्स आर्मस्ट्राँग या कंपनीची नियुक्ती केली होती. तब्बल 33 कोटी रुपयांची ही कामे डिसेंबर 2021 मध्ये मंजूर करण्यात आली.
जानेवारी 2022 मध्ये प्रत्यक्ष रस्त्याच्या कामांना सुरुवात झाली. नियमानुसार 24 महिन्यांत सदर कामे कंत्राटदाराला पूर्ण करायची होती. परंतु मंजूर मार्गांपैकी केळुस्कर मार्ग आणि एम. बी. राऊत मार्गाचे काम स्थानिक रहिवाशी आणि मनसेच्या विरोधानंतर एप्रिल
कंत्राटदाराच्या कंत्राट कामांमधून दोन रस्त्यांची कामे वगळल्याने दोन नवीन रस्त्यांची कामे त्याला देण्यात आली आहेत. त्यामुळे काकासाहेब गाळगीळ मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी सुमारे 11 कोटी रुपये आणि पंडित सातवळेकर मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी सुमारे साडेसहा कोटी तसेच पुरुषोत्तम
दोन रस्त्यांची कामे रद्द करण्यात आल्याने तत्कालीन स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी जय भारत इमारतीचा कॉर्नर ते श्री सिद्धिविनायक मंदिराचा प्रवेशद्वार या काकासाहेब गाडगीळ मार्ग आणि पंडित सातवळेकर मार्ग या दोन रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे पत्र दिले.