Worli Hit And Run
मुंबई : वरळीत हिट अँड रन; महिलेचा मृत्यू, कारचालक फरार File Photo
मुंबई

मुंबई : वरळीत हिट अँड रन; महिलेचा मृत्यू, कारचालक फरार

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईमधील वरळीत हिट अँड रनची घटना. वरळीतील  अॅट्रीया  मॉलजवळ धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरुन जाणाऱ्या दाम्पत्याला कारने फरपटत नेले. यात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. गाडी शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांची असल्याच समोर आले आहे. कारमध्ये शाह यांचा मुलगा आणि कारचालक होता. अपघातानंतर कारचालक फरार झाला आहे. Worli Hit And Run

वरळीत हिट अँड रन; महिलेचा मृत्यू,

मुंबईमधील वरळी येथुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वरळीमधील अॅट्रीया  मॉलजवळ धक्कादायक घटना घडली. दुचाकीवरुन जाणाऱ्या दाम्पत्याला कारने फरपटत नेले. जखमी महिलेला तात्काळ नजिकच्या हॉस्पिटलमध्ये नेले असता. डॉक्टरांनी मृत घोषीत केले. कावेरी नाखवा (वय ४५) असे मृत महिलेचे नाव असून त्या वरळी कोळीवाडा येथील रहिवासी आहेत.महिलेच्या पतीने गाडीवरुन उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला. अपघातानंतर कारचालक फरार झाला आहे. फरार चालकाचा पोलिस शोध घेत आहेत.

गाडी शिंदे गटाचे उपनेते यांच्या मालकीची

माहितीनुसार या घटनेतील कार ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांची असुन. अपघाता दरम्यान कारमध्ये राजेश शाह यांचा मुलगा  मिहिर शाह आणि कारचालक होता. अपघातानंतर कार चालक फरार झाला आहे. घटनेनंतर राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर  मिहिर शाह आणि कारचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. 

SCROLL FOR NEXT