मुंबई : चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून एका विमा एजंटची 1 कोटी 89 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चैतन्य पडाळकर आणि दस्तगीर कासी या सायबर ठगांच्या दोन साथीदारांना पश्चिम सायबर सेल पोलिसांनी अटक केली.
दोघांनाही वांद्रे स्थानिक न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 62 वर्षांचे तक्रारदार विमा एजंट असून ते अंधेरीतील सात बंगला परिसरात राहतात. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांना एका खासगी कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये काहींनी शेअरमध्ये गुंतवणूक केली. त्यात त्यांना चांगला फायदाही झाला. त्यामुळे ग्रुप ॲडमिनच्या सांगण्यावरुन त्यांनीही कंपनीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.
नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत त्यांनी विविध शेअरमध्ये 1 कोटी 89 लाख 53 हजार रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर त्यांना प्रचंड फायदा झाला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या खात्यातून दोन लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वारंवार प्रयत्न करुनही त्यांना त्यात यश आले नाही. त्यांनी ग्रुप ॲडमिनकडे विनंती केली असता त्याने त्यांचा क्रेडिट स्कोर कमी असल्याचे सांगत आणखी शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येतील असे सांगितले.
नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत त्यांनी विविध शेअरमध्ये 1 कोटी 89 लाख 53 हजार रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर त्यांना प्रचंड फायदा झाला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या खात्यातून दोन लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वारंवार प्रयत्न करुनही त्यांना त्यात यश आले नाही. त्यांनी ग्रुप ॲडमिनकडे विनंती केली असता त्याने त्यांचा क्रेडिट स्कोर कमी असल्याचे सांगत आणखी शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येतील असे सांगितले. मात्र त्यांनी आणखी शेअर खरेदी करण्यास नकार देताच त्याने त्यांना ब्लॉक केले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांच्याविरुद्ध सायबर सेलमध्ये तक्रार केली. पोलिसांनी चैतन्य पडाळकर आणि दस्तगीर कासी या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. दोघेही या गुन्ह्यांतील मुख्य सायबर ठगांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले.