Mumbai lakes water level pudhari photo
मुंबई

Mumbai lakes water level : पावसाने दडी मारल्याने तलावांतील पाणी आटले

मोडक सागरचा पाणीसाठा ७३ टक्केवर; अन्य तलावांतील साठाही घटला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी केवळ नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलाव वगळता अन्य तलाव तुडुंब भरली होती. परंतु या तलावातील पाणी आता आटू लागले आहे. यात मोडक सागर तलावातील पाणीसाठा ७३ टक्के इतका खाली आला आहे. अन्य तलावातीलही पाणीसाठा ३ ते ४ टक्क्याने घटला आहे.

तलावाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पाऊस समाधानकारक झाला असला तरी तलावातील पाण्याची पातळी मागील दोन वर्षाच्या तुलनेत कमी आहे. आता तर उष्णतेमध्ये वाढ झाल्यामुळे पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली आहे. ५ ऑक्टोबरला तलावातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला असता, ९५ टक्केवर पोहचला आहे.

मागील दोन वर्षात हाच पाणीसाठा ९९ टक्के पेक्षा जास्त होता. म्हणजेच सुमारे ५० हजार दशलक्ष लिटर्स पाणीसाठा कमी आहे. शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणारा भातसा तलाव १०० टक्के भरला होता. पण या तलावातील पाणीसाठा आता १७ हजार दशलक्ष लिटरने कमी झाला आहे. मोडक सागर तलावातील पाणीसाठा सुमारे ३४ हजार दशलक्ष लिटरने घटला आहे.

तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा व विहार आदी तलावातील पाणीसाठाही घटू लागला आहे. नॅशनल पार्कमधील विहार तलावामध्ये १०० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT