मुंबई : ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ३ हजार मिलीमीटर व्यासाच्या मुंबई- ३ जलवाहिनीमधून होणारी गळती बंद करण्याचे काम शुक्रवार रात्रीपासून सुरू आहे. परंतु तांत्रिक कारणांमुळे या दुरुस्ती कार्यवाहीत अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य दिना दिवशी शहर व पूर्व उपनगरात पाणीबाणी उद्भवली आहे.
अनेक भागात शनिवारी पाणीच आले नाही तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे मुंबई करायची चांगलीच धावपळ उडाली. नागरिकांनी सहकार्य करावे, असे नम्र आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.