Water Pressure Booster Pump Pudhari
मुंबई

Water Pressure Booster Pump: पाण्यासाठी मुंबईकरांचे नळाला ‌‘बूस्टर‌’ पंप; बाजारात पंपांची मागणी वाढली

पाच ते सहा हजारांवर गेले दर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: उन्हाची काहीली त्यात पाण्यासाठी जागरण यामुळे मुंबईकरांचे जीवनचक्र विस्कळीत झाले आहे. रात्रभर जागूनही पाणी मिळत नसल्याने आता बुस्टर म्हणून मोटर पंप लावून पाणी खेचण्यात येत आहे. त्यामुळे मोटर पंपांची बाजारात मागणी वाढली आहे.

याचा फायदा व्यापारीही घेत असून दरवाढ करून पंप विकत आहेत. साधारण 2100 रुपयात मिळणारे मोटर पंप 5 ते 6 हजारापर्यंत विकले जात आहेत. मुंबईत एप्रिल महिन्यापासून पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. कधी जलवाहिनीत बिघाड झाल्याने पाणी मिळत नाही.

तर कधी दुरुस्तीच्या नावाखाली जलवाहिनी बंद केल्याने पाणी कपात केली जाते. तर महापालिकेकडून पाच टक्के पाणी कपातीच्या नावावर 15 तं 20 टक्के कपात केली जात आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे.

चाळी, झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना पाणीच मिळत नाही. पाणी आले तरी कधी जाईल याचा नेम नाही. रात्री अपरात्री कधॅही पाणी येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी जागरण सुरू आहे.

त्यामुळे बुस्टर मोटर पंप लावून पाणी खेचने भाग पडत आहे. जुन्या इमारतीमध्ये सुद्धा मोटर पंप लावून पाणी सोडले जाते. परिणामी बाजारात मोटर पंपची जोरदार विक्री सुरू आहे. लोकल कंपनीचे पंप सुद्धा दुप्पटइ भावाने विकले जात आहे.

चाळीत रात्री तीन वाजता पाणी येते. तरी पाणी मिळत नाही. सकाळी काळे पाणी असते. त्यानंतर चांगले पाणी मिळवण्यासाठी मोटर लावावी लागते. मोटर नाही लावली तर पाणीच मिळत नाही.
-योगिता साळवी, गृहिणी खाररोड
उन्हाळात पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने बँडेड कंपन्यांपेक्षा लोकल कंपन्यांनी पंप बाजारात आणले आहेत. मात्र त्याची गॅरंटी देता येत नाही. बूस्टर मोटर पंप जास्त भाव आला आहे.
-अरविंद पटेल, मोटर पंप व्यापार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT