BMC  pudhari photo
मुंबई

Mumbai Road Washing Proposal: मुंबईकरांवर पाणीकपात, पण रस्ते धुण्यासाठी कोट्यवधींचा खर्च? ८.२५ कोटींचा प्रस्ताव नामंजूर

निवासी भागात १० टक्के आणि व्यावसायिक क्षेत्रात २० टक्के पाणीकपात लागू असताना टँकरने रस्ते धुण्याच्या प्रस्तावाला सत्ताधारी आणि विरोधकांचा विरोध

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत निवासी क्षेत्रात १० टक्के तर व्यावसायिक क्षेत्रासाठी २० टक्के पाणीकपात लागू असताना पालिका प्रशासनाचा मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी टँकरच्या साह्याने पाण्याने रस्ते धुण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांनी एकमताने फेटाळला. सभागृह नेते गणेश खणकर यांच्यासह सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेत विरोध दर्शविला.

महापालिकेने धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी टँकरचा वापर करून पाण्याने रस्ते धुतले होते. त्यानंतर यावर्षी पुन्हा एकदा टँकरद्वारे पाणी आणून सात परिमंडळातील रस्ते पाण्याने धुण्यासाठीचा ८.२५ कोटी रुपयांचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला.

त्याला सभागृहनेते गणेश खणकर यांनी त्यावर आक्षेप घेत विरोध दर्शवला. त्यास, शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी समर्थन दिले. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे गटनेते अशरफ आजमी सवाल उपस्थित केला.

शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी राज्यातील अनेक तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती असताना मुंबईत मात्र रस्ते पाण्याने धुतल्यास शेतकऱ्यांची थट्टा केल्यासारखे होईल, असे सांगत गणेश खणकर यांच्या मागणीला पाठिंबा दिला.

अध्यक्षांची नाराजी

स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी नाराजी व्यक्त करीत मुंबईतील धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी इमारत बांधकामे करणाऱ्या विकसकांवर काही प्रमाणात जबाबदारी टाकू शकतो का ते पाहावे, असे सांगत हा प्रस्ताव रेकॉर्ड केला.

मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी मुंबईत पाणी समस्या असताना पालिकेने पाणी वितरणाबाबत स्वतंत्र आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव, भाजपचे नगरसेवक तेजिंदर तिवाना यांनीही या प्रस्तावाला विरोध केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT